रोहितची सिंहाशी गट्टी
By Admin | Updated: January 19, 2015 10:59 IST2015-01-19T03:39:50+5:302015-01-19T10:59:46+5:30
सध्या टीव्हीवर झळकणारे ‘खतरों के खिलाडी’चे प्रोमोज् प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहेत. या कार्यक्रमाच्या सहाव्या सीझनचं शूटिंग दक्षिण आफ्रिकेत सुरू

रोहितची सिंहाशी गट्टी
सध्या टीव्हीवर झळकणारे ‘खतरों के खिलाडी’चे प्रोमोज् प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहेत. या कार्यक्रमाच्या सहाव्या सीझनचं शूटिंग दक्षिण आफ्रिकेत सुरू आहे. रोहित शेट्टी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत असून, यात तो चक्क एका सिंहाशी खेळत असल्याचा सिन दाखविण्यात येत आहे. शूटिंगच्या दिवशी रोहित सकाळी ६ वाजता लोकेशनवर पोहोचला; त्या वेळी सिंहाला बघून त्यालाही जरा भीती वाटली. पण नंतर मात्र त्यालाही गंमत वाटू लागली आणि त्याची त्या सिंहासोबत एकदम मस्त गट्टी जमली. सिंहसुद्धा शूटिंग होईपर्यंत शांत होता. या प्रोमोमुळे रोहित शेट्टी हा खरोखरच ‘खतरोंका खिलाडी’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रोमोवरून शो किती खतरनाक असेल याचा अंदाज न बांधणेच योग्य ठरेल.