'युझी भाईने इसका करिअर बना दिया', म्हणणाऱ्यांना आरजे महावशचं सडेतोड उत्तर; पुरावेच दाखवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:18 IST2025-06-21T12:18:13+5:302025-06-21T12:18:32+5:30

ट्रोलर्सच्या कमेंटचे स्क्रीनशॉट शेअर करत आरजे महावशचं रोखठोक उत्तर

RJ Mahavash s blunt reply to those who say Yuzi Bhai made her career | 'युझी भाईने इसका करिअर बना दिया', म्हणणाऱ्यांना आरजे महावशचं सडेतोड उत्तर; पुरावेच दाखवले

'युझी भाईने इसका करिअर बना दिया', म्हणणाऱ्यांना आरजे महावशचं सडेतोड उत्तर; पुरावेच दाखवले

क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा यावर्षी घटस्फोट झाला. यानंतर लगेच चहलचं नाव आरजे महावशसोबत (RJ Mahvash) जोडण्यात आलं. दोघांनी चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलही स्टेडियममध्ये एकत्र बसून एन्जॉय केली. तेव्हा त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले. यानंतर महावश अनेकदा चहलसोबत दिसली. आयपीएल सामन्यांवेळीही ती त्याच्यासोबत दौऱ्यावर होती. दरम्यान इंटरनेटवर अनेक जण महावशला ट्रोल करतात. चहलमुळेच हिचं करिअर बनलं असं म्हणतात. या ट्रोलर्सला महावशने आता सडेतोड उत्तर दिलं आहे.

आरजे महावशने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. 'युझी भाई ने इसका करिअर बना दिया' या कमेंटचा स्क्रीनशॉट तिने शेअर केला आहे. याच ट्रोलरला सडेतोड उत्तर देत ती २०१९ पासून इंडस्ट्रीत काम करत आहे याचे पुरावेच दाखवते. ती म्हणते, "मी २०१९ पासून या इंडस्ट्रीत आहे. हे सगळं होण्यापूर्वीचं मी माझं करिअर दाखवते. २०२३ साली माझं प्रोडक्शन हाऊस, नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतचा सेटवरील फोटो, 'सेक्शन १०८ सिनेमा',निर्मात्यांमध्ये महावशचं नाव, सहनिर्माता अरबाज खानसोबत फोटो, पुढील सिनेमाची घोषणा अशा बातम्यांचेही स्क्रीनशॉट ती व्हिडिओत शेअर करते."

'क्रिकेट पीचपर्यंत पोहोचली ही, क्रिकेटबद्दल हिला काही माहिती तरी आहे का? 'अशीही एकाची कमेंट ती वाचते. यावर ती म्हणते, "तू जन्मालाही आला नसशील छोटू तेव्हापासून मी क्रिकेट इव्हेंट्स होस्ट करत आहेत. व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीचे मेसेज वाचू नको."

'मोठमोठ्या लोकांना भेटतीये युझी भाईमुळे' या कमेंटवर ती सेलिब्रेटींसोबतचे जुने फोटो दाखवते. रश्मिका, सलमान, करण जोहरपासून जवळपास सर्वच सेलिब्रिटींसोबत तिचे जुने इव्हेंटचे फोटो आहेत. तसंच टॅलेंटवरुन ट्रोल करणाऱ्यांना सुनावत म्हणते, 'मी २ पुस्तकं लिहिली आहेत."


आरजे महावशने या व्हिडिओतून अख्खं करिअरच दाखवलं आहे. तिचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. तसंच सर्वांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. व्हिडिओच्या शेवटी महावश युजवेंद्रचं नाव घेत त्याचंही कौतुक करते. तो खूप टॅलेंटेड आहे आणि माझा मित्र आहे. म्हणून मी त्याला कायम चीअर करते.

Web Title: RJ Mahavash s blunt reply to those who say Yuzi Bhai made her career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.