रितेश म्हणतो माझी बायको टिनएजर
By Admin | Updated: October 24, 2016 02:33 IST2016-10-24T02:33:29+5:302016-10-24T02:33:29+5:30
अभिनेता रितेश देशमुख सध्या चांगलाच लाइमलाइटमध्ये आला आहे. चित्रपट, कार्यक्रम आणि टीव्हीवरील रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करून तो प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचला आहे

रितेश म्हणतो माझी बायको टिनएजर
अभिनेता रितेश देशमुख सध्या चांगलाच लाइमलाइटमध्ये आला आहे. चित्रपट, कार्यक्रम आणि टीव्हीवरील रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करून तो प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचला आहे. एवढेच नाही, तर रितेश आता ‘फास्टर फेणे’ या मराठी चित्रपटाची निर्मिती त्याच्या बायकोसोबत म्हणजेच जेनेलियाला घेऊन करीत आहे. नुकताच त्याने जेनेलियासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या फोटोमध्ये हे दोघेही नवरा-बायको खूपच क्यूट दिसत आहेत. रितेश सध्या त्याच्या वाढलेल्या दाढीला घेऊन खूपच चर्चेत आहेत, तर जेनेलिया दोन मुलांची आई असूनदेखील एकदम फिट आणि बबली गर्ल दिसत आहे. त्यामुळेच की काय रितेशने सांगतोय, ‘माझी बायको एकदम टिनएजरच दिसतेय.’ रितेश एवढे बोलून थांबलेला नाही, तर हा पठ्ठ्या स्वत:ला जेनेलियाचा बाप समजतोय. आता याला म्हणावे तरी काय? दाढी वाढवली म्हणजे रितेश काही म्हातारा होत नाही रे, हे त्याला कोण सांगणार? असे काय झाले, की रितेश स्वत:ला जेनेलियाचा बाप म्हणतोय, हे आता तोच सांगू शकेल. रितेशला काहीही वाटत असले, तरी या दोघांच्या जोडीला बघून प्रेक्षक नेहमीच ‘लय भारी’ असचे म्हणतात, यात काही शंका नाही. जेनेलिया आणि रितेशला रिआन आणि राहिल अशी दोन मुले आहेत. दोन मुलांची आई असूनदेखील जेनेलिया मेंटेन असल्याचेच दिसते. ती चित्रपटात जरी झळकली नसली, तरी लवकरच आपल्याला एखाद्या हिंदी किंवा मराठी चित्रपटात जेनेलिया दिसू शकते. सध्या फास्टर फेणे चित्रपटाच्या निर्मितीमध्ये हे कपल व्यस्त आहे.