"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
By कोमल खांबे | Updated: September 19, 2025 11:07 IST2025-09-19T11:06:32+5:302025-09-19T11:07:59+5:30
कामानिमित्त जेव्हा रिंकू एकटी मुंबईत असते तेव्हा ती सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाऊन बसते. रिंकूने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत ही खास गोष्ट सांगितली.

"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
सैराट सिनेमात आर्चीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात आणि सिनेसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण करणारी गुणी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. एका सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या रिंकूपुढे नंतर सिनेमांची रांग लागली. काही हिंदी सिनेमांमध्येही रिंकू झळकली आहे. पण, कामानिमित्त जेव्हा रिंकू एकटी मुंबईत असते तेव्हा ती सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाऊन बसते. रिंकूने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत ही खास गोष्ट सांगितली.
लोकमत फिल्मीच्या 'नो फिल्टर'मध्ये रिंकूने हजेरी लावली होती. ती म्हणाली, "घर आणि काम एवढंच करणारी मी मुलगी आहे. मी खूप कमी फिरते. मी सिद्धिविनायकला जाते. कारण माहिती नाही मला आवडतं मंदिर... मुंबईत माझी फॅमिली नाही, तसं कोणी नाहीये... तर मला जेव्हा काही काम नसेल किंवा मला करमत नसेल. एकटं वाटतंय तेव्हा मग मी सिद्धिविनायकला जाऊन बसते. मला मजा येते".
दरम्यान, रिंकू ही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. नवीन प्रोजेक्टसोबत वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती चाहत्यांना देत असते. सैराटनंतर रिंकू 'कागर', 'झिम्मा २', 'मेकअप', 'आठवा रंग प्रेमाचा' या सिनेमांमध्ये दिसली. तर 'झुंड', '२०० हल्ला हो' या हिंदी सिनेमांमध्येही ती झळकली आहे.