रिचा साकारणार नवीन पारो
By Admin | Updated: February 8, 2015 00:58 IST2015-02-08T00:58:43+5:302015-02-08T00:58:43+5:30
चंद्रा चट्टोपाध्याय यांच्या ‘देवदास’ला बॉलिवूडमध्ये एक विशेष स्थान आहे. अनेक प्रभावी पात्रे असणाऱ्या देवदासमधल्या ‘पारो’ला आता रुपेरी पडद्यावर घेऊन येणार आहे

रिचा साकारणार नवीन पारो
चंद्रा चट्टोपाध्याय यांच्या ‘देवदास’ला बॉलिवूडमध्ये एक विशेष स्थान आहे. अनेक प्रभावी पात्रे असणाऱ्या देवदासमधल्या ‘पारो’ला आता रुपेरी पडद्यावर घेऊन येणार आहे अभिनेत्री रिचा चढ्डा. सुधीर मिश्रांच्या पारोसाठी तिने आतापर्यंत पारोच्या सर्व पात्रांचा कसून अभ्यास केला आहे. ‘साहेब बिवी और गुलाम’, ‘देवदास’, ‘हॅम्लेट’ यांतील संमिश्र भूमिका ही पारो बजावणार आहे. त्यामुळे पारोची भूमिका ही माझ्यासाठी एक मोठी जबाबदारीच आहे, असे म्हणत या भूमिकेत मी माझ्या परीने नावीन्य आणेन, असा विश्वास तिने व्यक्त केला.