रिचा बनणार कॅबरे गर्ल
By Admin | Updated: November 23, 2014 00:57 IST2014-11-23T00:57:45+5:302014-11-23T00:57:45+5:30
‘गँग्ज ऑफ वासेपूर’ या चित्रपटातील भूमिकेमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री रिचा चड्ढा देसी कॅबरे या चित्रपटात एका कॅबरे गर्लच्या भूमिकेत दिसणार आहे.

रिचा बनणार कॅबरे गर्ल
‘गँग्ज ऑफ वासेपूर’ या चित्रपटातील भूमिकेमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री रिचा चड्ढा देसी कॅबरे या चित्रपटात एका कॅबरे गर्लच्या भूमिकेत दिसणार आहे. मागील दोन वर्षापासून या भूमिकेसाठी योग्य अशा अभिनेत्रीच्या शोधात असलेल्या पूजा भट्टचा शोध रिचा चड्ढाच्या रूपात पूर्ण झाला. पूजाला या भूमिकेसाठी एक नवोदित अभिनेत्रीही आवडली होती; पण शेवटी तिने रिचाची निवड केली. पूजानेही या बातमीला दुजोरा दिला आहे. ती म्हणाली, ‘मी एका नवोदित अभिनेत्रीला या चित्रपटासाठी साईन करणार होते; पण पुढे मला वाटले की, या भूमिकेसाठी नवोदित अभिनेत्रीकडून फारशा अपेक्षा करणो योग्य नाही.’ या चित्रपटात रिचाला कॅबरे करायचा आहे; पण तिला अभिनयही तेवढाच दमदार करावा लागणार आहे. या भूमिकेसाठी रिचाला फिटनेसची आवश्यकता असून पूजा भाऊ राहुल भट्ट तिला यासाठी ट्रेनिंग देणार आहे. चित्रपटात तिच्यासोबत गुलशन देवाईया मुख्य भूमिकेत दिसणार असून दिग्दर्शन नारायण नियोगी
करणार आहेत.