Manto Movie Review : भारावून सोडणारी कथा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 02:27 PM2018-09-21T14:27:08+5:302023-08-08T19:47:32+5:30

‘मंटो’ हा चित्रपट दिग्गज लघुकथा लेखक सआदत हसन मंटो यांच्या आयुष्यावर बेतलेले बायोपिक आहे. मंटो यांच्या आयुष्यातील अनेक चढऊतार, वाद दाखवणारा हा चित्रपट कसा आहे, जाणून घेऊ यात...

Manto Movie Review | Manto Movie Review : भारावून सोडणारी कथा!

Manto Movie Review : भारावून सोडणारी कथा!

Release Date: September 21,2018Language: हिंदी
Cast: नवाजुद्दीन सिद्दीकी, रसिका दुग्गल, ताहिर राज भसीन, इला अरूण
Producer: नंदिता दास, अजीत अंधेरे, नम्रता गोयल, विक्रम बत्रा Director: नंदिता दास
Duration: १ तास ५७ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

- जान्हवी सामंत

मंटो’ हा चित्रपट दिग्गज लघुकथा लेखक सआदत हसन मंटो यांच्या आयुष्यावर बेतलेले बायोपिक आहे. मंटो यांच्या आयुष्यातील अनेक चढऊतार, वाद दाखवणारा हा चित्रपट कसा आहे, जाणून घेऊ यात...

सआदत हसन मंटो यांच्या पुरोगामी पण तेवढ्याच वादग्रस्त ठरलेल्या साहित्याशी आणि मंटोच्या बंडखोर व संघर्षपूर्ण आयुष्याशी परिचय असलेल्यांना ‘मंटो’ हा  चित्रपट अगदी जवळचा वाटेल. नंदिता दासचा हा महत्त्वाकांक्षी चित्रपट मंटोच्या जिगीषेला अगदी सच्ची श्रद्धांजली आहे. एका बाजूला पराकोटीची संवेदनशीलता आणि दुस-या बाजूला तितकेच बंडखोर विचार, एका बाजूला मानवी संवेदना, समाज आणि धर्माबद्दलचे तीक्ष्ण आकलन आणि दुस-या बाजूला समाजाचे विविध पैलू बघून आलेले हताशपण असे मंटोचे आयुष्य होते.  पाकिस्तानात निषिद्ध असलेल्या या लेखकाचे आयुष्य नंदिता दासचे अगदी बेमालूमपणे चितारले आहे. मंटोच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू, भारताचा स्वातंत्र्य संग्राम, फाळणीनंतरचे राजकारण, त्यानंतर उमटलेले पडसाद व या सगळ्यांचा मंटोच्या साहित्यावरचा प्रभाव हे सगळे नंदिता दासने या चित्रपटात अतिशय संवेदशनशीलपणे दर्शवले आहेत.  बू, ठंडा गोश्त, टोबा टोक सिंग अशा मंटोच्या अजरामर लघूकथाही या चित्रपटात सुंदरपणे गोवल्या आहेत. या कथा लिहिण्यामागची सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी आणि मंटोचे भावविश्व याचा सुंदर मेळ चित्रपटात दिसतो.
 धर्माबद्दलच्या परखड विचारांमुळे मंटोला कायम विरोध पत्करावा लागला. माणुसकी हा धर्म मानणा-या मंटोचे साहित्य अश्लिल ठरवले गेले. पण मंटो कुणालाच जुमानला नाही. उलट धर्म म्हणजे काय, धर्म शोषित उपेक्षितांसाठी काय करतो, आपला नक्की धर्म कुठला, असे अनेक मुद्दे मंटोने आपल्या बचावार्थ उभे केले. अर्थात त्याचे हे पराकोटीचे पुरोगामी विचार लोकांना पचले नाहीत.  त्याच्याविषयी असलेल्या द्वेष आणि असूयेपोटी एका महान कलाकाराची प्रचंड हेळसांड झाली़ आर्थिक फरफट शिवाय मद्याचे व्यसन या सगळ्यांमुळे मंटो आणि त्याच्या कुटुंबाचे जीवन रसातळाला गेले.  नंदिता दासने अगदी सच्चेपणाने त्याच्या आयुष्याचे चित्रण केले आहे. केवळ मंटोच्याच नाही प्रत्येक कलाकाराचे भावविश्व, त्याच्या मनातील द्वंद्व, अंतर्मनातील संघर्ष प्रातिनिधिक रूपात नंदीताने दर्शवला आहे.
 मंटोचे चाहते असाल तर हा चित्रपट तुमच्यासाठी आहे. तो पाहायलाचं हवा. मंटोचे चाहते नसाल तर आधी त्यांच्या साहित्याची मुशाफिरी करा आणि नंतर हा चित्रपट बघा.
 

 

Web Title: Manto Movie Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.