धर्म दहशतवाद शिकवत नाही - आमीर खान

By Admin | Updated: July 7, 2016 14:06 IST2016-07-07T13:56:15+5:302016-07-07T14:06:05+5:30

बांगलादेशातील ढाका शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तपासयंत्रणांच्या रडारवर असलेल्या डॉ. झाकीर नाईक यांच्यावर बोलताना धर्म दहशतवाद शिकवत नाही असं मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने म्हटलं आहे

Religion does not teach terrorism - Aamir Khan | धर्म दहशतवाद शिकवत नाही - आमीर खान

धर्म दहशतवाद शिकवत नाही - आमीर खान

>
ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 07 - बांगलादेशातील ढाका शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तपासयंत्रणांच्या रडारवर असलेल्या डॉ. झाकीर नाईक यांच्यावर बोलताना धर्म दहशतवाद शिकवत नाही असं मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने म्हटलं आहे. धर्माचा चुकीच्या पद्धतीने प्रचार केला जातो असंही आमीर खान यावेळी बोलला आहे. ईदच्या पार्श्वभुमीवर आमीर खानने पत्रकार परिषद बोलावली होती. यानिमित्ताने आमीर खानने अनेक विषयांवर चर्चा केली. 
 
'धर्म दहशतवाद शिकवत नाही. जे लोक दहशतवाद पसरवतात आणि जे लोक दहशतवाद करतात त्यांचं धर्माशी काही घेणं-देणं नसतं. मग ते कोणत्याही धर्माचे असो. जर त्यांनी धर्माचं खरोखर पालन केलं असत तर त्यांनी प्रेम शिकवलं असतं',  असं आमीर खान यावेळी बोलला आहे. 
 
'सुलतान' खूप आवडला - 
आमीर खानने सुलतान चित्रपट पाहिला असून मला तो प्रचंड आवडला असल्याचं म्हटलं आहे. चित्रपट पाहताना मी प्रचंड एन्जॉय केला असून हसलो आणि रडलोदेखील. सलमान मला प्रचंड आवडला असून चित्रपट पाहून एकदम खुश झालो असं आमीर खानने सांगितलं आहे. 
 

Web Title: Religion does not teach terrorism - Aamir Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.