परिणितीला करायचेत प्रादेशिक चित्रपट
By Admin | Updated: November 5, 2014 00:38 IST2014-11-05T00:38:50+5:302014-11-05T00:38:50+5:30
सध्या ‘किल दिल’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी असलेल्या परिणिती चोप्राला आता प्रादेशिक चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा आहे.

परिणितीला करायचेत प्रादेशिक चित्रपट
सध्या ‘किल दिल’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी असलेल्या परिणिती चोप्राला आता प्रादेशिक चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा आहे. तिच्या मते तिने पदार्पणापासूनच वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. प्रादेशिक चित्रपटांत काम करणे जास्त आव्हानात्मक असेल, असे ती मानते. परिणिती म्हणाली, ‘सोनाक्षी सिन्हा आणि आलिया भट्टसारख्या माझ्या समवयस्क अभिनेत्रींना लुटेरासारख्या करिअर डिफायडिंग भूमिकांची गरज आहे, कारण त्या हर तऱ्हेच्या भूमिका करीत आहेत. परिणितीचा
किल दिल हा चित्रपट येत्या १४ नोव्हेंबरला सर्वत्र रिलीज होत आहे.