परिणितीला आवडला रणवीरचा नवा लूक
By Admin | Updated: October 27, 2014 00:01 IST2014-10-27T00:01:51+5:302014-10-27T00:01:51+5:30
अभिनेता रणवीर सिंहने ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटासाठी डोक्याचा चमनगोटा केला आहे. ‘किल दिल’मधील रणवीरची सहकलाकार परिणिती चोपडा हिला रणवीरचा हा लूक भावला आहे

परिणितीला आवडला रणवीरचा नवा लूक
अभिनेता रणवीर सिंहने ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटासाठी डोक्याचा चमनगोटा केला आहे. ‘किल दिल’मधील रणवीरची सहकलाकार परिणिती चोपडा हिला रणवीरचा हा लूक भावला आहे. ‘टक्कल केल्यानंतरही काही पुरुष आकर्षक दिसत असतात. रणवीर हा त्यापैकीच एक आहे. डोक्याचा चमनगोटा केल्यानंतर मी त्याला बघितले. त्याचे रूप यामुळे आणखी खुलून दिसत आहे,’ असे परिणितीने सांगितले. ‘बाजीराव मस्तानी’ हा रणवीरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक असेल, असा विश्वासही तिने व्यक्त केला. परिणितीदेखील आपल्या बहुतांश चित्रपटात सामान्य मुलीच्या रूपातच दिसली आहे. आतापर्यंतच्या एकाही चित्रपटात तिने बिकिनी दृश्य दिले नाही. ‘शारीरिकदृष्ट्या मी बिकिनीसाठी सध्या तरी योग्य नाही. माझे शरीर ज्यावेळी बिकिनीला सूट होईल तेव्हा मी ती आवश्य परिधान करील, असेही ती म्हणाली.