रणवीर-सैफमध्ये झाले वाद
By Admin | Updated: November 6, 2014 02:14 IST2014-11-06T02:14:03+5:302014-11-06T02:14:03+5:30
सैफ अली खान शुटिंगच्या सेटवर फारसा रागावताना दिसत नाही. पण हॅप्पी एंडिंग या चित्रपटाचे अमेरिकेत शुटिंग सुरू असताना असे काही घडले

रणवीर-सैफमध्ये झाले वाद
सैफ अली खान शुटिंगच्या सेटवर फारसा रागावताना दिसत नाही. पण हॅप्पी एंडिंग या चित्रपटाचे अमेरिकेत शुटिंग सुरू असताना असे काही घडले की, सैफचा राग अनावर झाला. सेटवर एका डायलॉगवरून सैफ आणि त्याचा को स्टार रणवीर शौरी यांच्यात वाद झाले. सूत्रांनुसार हा वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा रणवीरला एक डायलॉग आवडला नाही, त्याने दिग्दर्शकाला त्यात काही बदल सुचवले. सैफला मात्र त्या डायलॉगमध्ये काहीही चुकीचे वाटले नाही, त्यामुळे त्यात काही बदल करण्याची गरज नाही असे त्याचे म्हणणे होते. दोघांच्याही परस्परविरोधी मतांमुळे तेथील वातावरण तणावपूर्ण झाले होते. त्यानंतर दोघांनी एकमेकांशी बोलल्याशिवाय त्यांचे शॉट्स पूर्ण केले. पॅकअपनंतर मात्र दोघांचे बोलणे पुन्हा सुरू झाले. झालेला वाद जागच्या जागी विसरून जाणेच त्यांना योग्य वाटले.