रिलीजपूर्वीच 'रंगून'च्या 70 सीन्सला कात्री
By Admin | Updated: February 23, 2017 11:50 IST2017-02-23T11:50:32+5:302017-02-23T11:50:32+5:30
दुस-या विश्वयुद्धावर आधारीत रंगून या चित्रपटाला सेन्सर बोर्डाची कात्री, सिनेमा 13 मिनिटांनी झाला कमी.

रिलीजपूर्वीच 'रंगून'च्या 70 सीन्सला कात्री
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - दुस-या विश्वयुद्धावर आधारीत 'रंगून' या चित्रपटाला सेन्सर बोर्डाने कात्री लावली आहे. त्यामुळे उद्या प्रदर्शित होणारा हा सिनेमा 13 मिनिटांनी कमी झाला आहे.
डिएनएने दिलेल्या वृत्तानुसार, सेन्सर बोर्डाने चित्रपटातील तब्बल 70 सीन कट केले आहेत. त्यामुळे आधी 2 तास 47 मिनिटांचा असलेला हा सिनामा आता 2 तास 34 मिनिटांचा झाला आहे.
दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या 'रंगून' चित्रपटात कंगना रणौत, शाहिद कपूर आणि सैफ अली खान हे त्रिकूट दुसऱ्या महायुद्धाच्या आठवणींना उजाळा देणार आहे.