रमन राघव - ड्रग्ज, सेक्स आणि फक्त मर्डर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2016 05:43 IST2016-06-24T05:43:53+5:302016-06-24T05:43:53+5:30

मुंबईचा 60 च्या दशकातला सिरिअल किलर 'रमन राघव'पासून प्रेरित 'रमन राघव 2.0' चित्रपट या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे..

Raman Raghav - Drugs, Sex and Only Murder ... | रमन राघव - ड्रग्ज, सेक्स आणि फक्त मर्डर...

रमन राघव - ड्रग्ज, सेक्स आणि फक्त मर्डर...

रेटिंग : 2 स्टार 
शिवराज यादव / सुवर्णा जैन -
मुंबई, दि. 24 - मुंबईचा 60 च्या दशकातला सिरिअल किलर 'रमन राघव'पासून प्रेरित 'रमन राघव 2.0' चित्रपट या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे....नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भुमिकेत असल्याने प्रेक्षकांच्या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. अनुराग कश्यपचा चित्रपट असल्याने यामध्ये नेहमीप्रमाणे ड्रग्ज, सेक्स आणि मर्डर या गोष्टी आहेतच. त्यातच सिरिअल किलरवर चित्रपट आधारित असल्याने प्रचंड हिंसा असणार हे वेगळं सांगायला नको. चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीव्यतिरिक्त विकी कौशल मुख्य भुमिकेत आहे. पण नवाजुद्दीनचा अभिनय वगळता चित्रपटात पाहण्यासारखं काही नाही. मित्रांसोबत चित्रपट पाहायला जायचा विचार करत असाल तर त्याऐवजी दुसरा प्लॅन केलात तरी चालेल.

चित्रपट सुरु होतो ड्रग्जच्या आहारी गेलेल्या पोलीस अधिका-यापासून...विकी कौशलने ही भुमिका निभावली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने हत्या केलेल्या ठिकाणी तो पोहोचतो आणि ड्रग्ज घेऊन पळून जायचा प्रयत्न करतो. आणि स्वत: दुस-याचा खून करतो. त्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी पोलिसांसमोर हजर होऊन गुन्हा कबूल करतो, पण पोलीस त्याला सोडून देतात. पोलीस त्याने सांगितलेली माहिती न तपासता कसं काय सोडून देतात ? हे जरा खटकतं.

नवाजुद्दीन सिद्दीकीने नेहमीप्रमाणे मास्टरस्ट्रोक मारत अभिनय केला आहे. संपुर्ण चित्रपटात फक्त त्याच्याकडेच लक्ष जातं. गंभीर डायलॉग बोलता बोलता मधेच हसवण्याची त्याचं टायमिंग जबरदस्त आहे. मात्र काही काही ठिकाणी बदलापूर चित्रपटातला नवाजुद्दीन आठवतो. त्यामुळे अभिनयात तोच तोचपणा जाणवतो.

अमृता सुभाषच्या वाट्याला छोटी भुमिका आली आहे. तिने ही भुमिका केली नसती तरी चालली असतं. पण तिला बॉलिवूडमध्ये मिळालेली ही संधी म्हणून पाहायला हरकत नाही. वाट्याला आलेली भुमिका तिने उत्तम निभावली आहे. ड्रग्ज आणि मुलींच्या आहारी गेलेल्या पोलीस अधिका-याची भुमिका विकी कौशलने निभावली आहे. त्याने अभिनय चांगला केला आहे मात्र काही काही ठिकाणी त्याला नेमकं होतय काय ? असा प्रश्न पडतो.

चित्रपटाच्या पहिल्या भागात उत्कंठा वाढते मात्र दुसरा भाग पुर्णपणे निराशा करतो. काही सीन्समधून इमोशनल ड्रामा तयार करण्याचा प्रयत्न केला आहे., ज्याची खरतर गरज नव्हती. थोडक्यात सांगायचं तर रमन म्हणजे नवाजुद्दीन जो राघवच्या शोधात फिरत असतो. जो राघव त्याला विकी कौशलमध्ये सापडतो.
अनुराग कश्यपच्या चित्रपटांचे फॅन असाल तर कदाचित तुम्हाला चित्रपट आवडेल. पण मनोरंजनासाठी म्हणून जाणार असाल तर तुमची निराशा होईल.

Web Title: Raman Raghav - Drugs, Sex and Only Murder ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.