'ठरलं तर मग'च्या सेटवर साजरं झालं रक्षाबंधन, 'या' खास व्यक्तीने जुई गडकरीला बांधली राखी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 11:28 IST2025-08-11T11:27:42+5:302025-08-11T11:28:46+5:30
जुई गडकरीला एका खास व्यक्तीने राखी बांधली. नेमकी ही खास व्यक्ती कोण आहे, हे जाणून घेऊया.

'ठरलं तर मग'च्या सेटवर साजरं झालं रक्षाबंधन, 'या' खास व्यक्तीने जुई गडकरीला बांधली राखी!
Jui Gadkari: जुई गडकरी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. जुईला आपण विविध मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय. जुईने 'पुढचं पाऊल' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. जुई सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचे अपडेट्स शेअर करताना दिसते. जुईने सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट केली आहे. ज्यामुळे चाहते तिचं कौतुक करत आहेत.
जुई गडकरी सध्या स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' या मालिकेत काम करतेय. या मालिकेच्या सेटवर रक्षाबंधन साजरं झालं. जुईला तिची हेअरड्रेसर काजलने राखी बांधली आहे. जुई गडकरीनं इन्स्टाग्रामवर याचा एक सुंदर व्हिडीओ शेअर करत लिहलं, "ती मला म्हणाली माझं असंच कायम रक्षण करा… आम्ही एकत्र रडतो, हसतो, भांडतो, मजा करतो, काम करतो… एकंदर काय तर हे आमचं प्रेम आहे. काजल आमची हेअरड्रेसर आहे. प्रिय, काजल काळजी करू नकोस मी सदैव तुझं रक्षण करेन", असं जुईनं म्हटलं. या व्हिडीओवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय.
दरम्यान, जुईची 'ठरलं तर मग' ही मालिका अतिशय लोकप्रिय मालिका आहे. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका कायमच अव्वल स्थानावर असते. या मालिकेत जुई ही सायली या पात्राच्या भुमिकेत आहे. चाहते न चुकता ही मालिका रोज पाहतात. सोशल मीडियावर सुद्धा या मालिकेची क्रेझ भरपूर आहे. जुईने 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'पुढचं पाऊल', 'सरस्वती' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. 'बिग बॉस मराठी'मध्येही ती सहभागी झाली होती.