राजु श्रीवास्तवचा खुलासा, म्हणाला बेशिस्त आहे कपिल शर्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 19:21 IST2017-03-31T13:51:51+5:302017-03-31T19:21:51+5:30
चर्चा तर होणारच,कारण बातमी कॉमेडी किंग कपिल शर्मासह जो कोणी राहिल तो त्याला कपिल विषयी वाईट अनुभव आल्याशिवाय राहणार ...
.jpg)
राजु श्रीवास्तवचा खुलासा, म्हणाला बेशिस्त आहे कपिल शर्मा
च ्चा तर होणारच,कारण बातमी कॉमेडी किंग कपिल शर्मासह जो कोणी राहिल तो त्याला कपिल विषयी वाईट अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. असे आम्ही नाहीतर चक्क कॉमेडीयन राजु श्रीवास्तवनेच कपिलविषयी एक रहस्य उघड केले आहे. आता पुन्हा काय झाले असा प्रश्न तुम्हाला पडला असणारच त्याचे झाले असे की, जेव्हा कपिल शर्मा दारूच्या नशेत असतो तेव्हा त्याचा स्वत:वरून ताबा सुटतो आणि त्याच्या मनात जे येईल ते तो बोलत सुटतो.त्यावेळी त्याचे बोलणेही इतके उर्मट असते की, ऐकणा-याला राग अनावर होतो.सध्या त्याचा सुनील गोव्हरसह झालेला वाद हा काही नवीन नाहीय.याआधीही कपिलने त्यांच्या सहकालाकारासह बेशिस्त वागला होता मात्र त्यावेळी या गोष्टी बाहेर न आणता त्यावर पडता टाकण्यात आला.मात्र यावेळी सुनील गोव्हरमुळे कपिलचे हे बेशिस्त वागणूनक अख्याजगा समोर आली आहे. त्यामुळे खपिलचे खरे रूप आता प्रेक्षकांना कळाले आहे असे राजीव श्रीवास्तवने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे.रसिकांचे कपिल शर्मावर खूप प्रेम आहे,मात्र त्याचा बेशिस्तपणा रसिक सहन करणार नाहीत असेही राजीव श्रीवास्तने सांगितले.कपिल शर्माला त्याच्या यशामुळे खूप गर्व आला आहे.जेव्हा शाहरूख खान कपिलच्या सेटवर प्रमोशनसाठी आला होता.तेव्हा काही चाहते शाहरूखला भेटण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यावेळी कपिलने चाहत्यांना खडेबोल सुनावले होते. त्यावेळी शोसाठी आलेला ऑडीयन्स कपिलवर खूप नाराजही झाले होते, तसेच विद्या बालन नुकतीच बेगम जान सिनेमासाठी कपिलच्या शोमध्ये हजेरी लावली होती.त्यावेळी चक्क विद्या बालनला फक्त कपिलसाठी 6 तास वाट पाहावी लागली होती.इतकेच नाहीतर ओके जानू सिनेमासाठी श्रध्दा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांना 5 तास कपिलची वाट पाहावी लागली होती.त्यामुळे कपिलच्या डोक्यात हवा गेली आहे अशा चर्चा सेलिब्रेटीं करताना दिसायाचे असे कळतंय. त्यामुळे सगळ्यांचा लाडका कपिलची पाय जमीनीवर कधी येणार याच चर्चा इंडस्ट्रीत रंगतात.या सगळ्या चर्चांकडे दुर्लक्ष करत कपिल मात्र सुनील गोव्हरला भेटण्यासाठी खूप प्रयत्नही करतोय.पण सुनील गोव्हर सध्या मुंबई बाहेर असल्याकारणारने त्याला सुनीलला भेटणे शक्य होत नाहीय,सुनील मुंबईत येताच कपिलच्या घरी सुनील गोव्हर, अली असगर,चंदन प्रभाकर यांना बोलवून त्यांच्याशी एक मीटींग करत कपिलची आई हे भांडण मिटवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे.