लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा

By कोमल खांबे | Updated: November 15, 2025 08:59 IST2025-11-15T08:58:59+5:302025-11-15T08:59:59+5:30

अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांच्या घरी पाळणा हलला आहे. लग्नानंतर ४ वर्षांनी राजकुमार राव आणि पत्रलेखा आईबाबा झाले आहेत. पत्रलेखाने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. 

rajkumar rao and patralekha blessed with baby girl on their 4th wedding anniversary | लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा

लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा

यंदाचं वर्ष हे काही बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी खऱ्या अर्थाने खास ठरलं आहे. कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा, विकी कौशल-कतरिना कैफ यांच्यानंतर बॉलिवूडमधील आणखी एक कपल आईबाबा झाले आहेत. अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांच्या घरी पाळणा हलला आहे. लग्नानंतर ४ वर्षांनी राजकुमार राव आणि पत्रलेखा आईबाबा झाले आहेत. पत्रलेखाने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. 

राजकुमार राव आणि पत्रलेखा यांना कन्यारत्न प्राप्त झालं आहे. विशेष म्हणजे लग्नाच्या वाढदिवशीच त्यांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. राजकुमार रावने सोशल मीडियावरुन ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. शनिवारी(१५ नोव्हेंबर) राजकुमार राव आणि पत्रलेखा यांना मुलगी झाली आहे. आज त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस आहे. लग्नाच्या वाढदिवशीच त्यांच्या घरात लक्ष्मी आली आहे. "आमच्या लग्नाच्या चौथ्या वाढदिवशी देवाने दिलेलं हे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे", असं म्हणत राजकुमार रावने बाबा झाल्यानंतर त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 


राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी १५ नोव्हेंबर २०२१ रोजी लग्न करत संसार थाटला होता. काही महिन्यांपूर्वीच आईबाबा होणार असल्याची गुडन्यूज त्यांनी चाहत्यांना दिली होती. आता लग्नानंतर चार वर्षांनी आईबाबा झाल्याने ते आनंदी आहेत. चाहते आणि सेलिब्रिटींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

Web Title : राजकुमार राव और पत्रलेखा को शादी की सालगिरह पर बेटी का आशीर्वाद!

Web Summary : राजकुमार राव और पत्रलेखा ने अपनी चौथी शादी की सालगिरह पर एक बच्ची का स्वागत किया। दंपति अपनी बेटी के आगमन से बहुत खुश हैं, और उसे भगवान का 'सबसे बड़ा उपहार' बता रहे हैं। हस्तियों और प्रशंसकों ने जोड़े को बधाई संदेशों की बौछार की है।

Web Title : Rajkummar Rao and Patralekhaa blessed with baby girl on anniversary!

Web Summary : Rajkummar Rao and Patralekhaa welcomed a baby girl on their fourth wedding anniversary. The couple is overjoyed with the arrival of their daughter, calling her the 'biggest gift' from God. Celebrities and fans have showered the couple with congratulatory messages.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.