राहुल देव झळकणार मराठी सिनेमात

By Admin | Published: May 17, 2017 04:39 AM2017-05-17T04:39:04+5:302017-05-17T04:39:04+5:30

अभिनेता राहुल देव आता मराठी सिनेमात झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. होय, ‘रॉकी’ या अ‍ॅक्शनपॅक मराठी सिनेमाच्या माध्यमातून राहुल देव पहिल्यांदाच

Rahul Dev will be seen in Marathi cinema | राहुल देव झळकणार मराठी सिनेमात

राहुल देव झळकणार मराठी सिनेमात

googlenewsNext

अभिनेता राहुल देव आता मराठी सिनेमात झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. होय, ‘रॉकी’ या अ‍ॅक्शनपॅक मराठी सिनेमाच्या माध्यमातून राहुल देव पहिल्यांदाच मराठीत काम करणार आहेत. प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्याच्या हेतूने तरुणाईच्या पसंतीस उतरेल असा कथा विषय, संगीत असलेले चित्रपट अलीकडच्या काळात कौतुकास पात्र ठरलेत हेच लक्षात घेऊन लवकरच ‘रॉकी’ हा अ‍ॅक्शनपॅक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा मुहूर्त नुकताच बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक व नृत्यदिग्दर्शक अहमद खानच्या हस्ते करण्यात आला. हा चित्रपट रसिकांचे फुल आॅन मनोरंजन करेल, असा विश्वास व्यक्त करताना अहमद खानने चित्रपटाला मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. रोमान्स, फॅमिली ड्रामा आणि अ‍ॅक्शन याचे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेल्या रॉकी या सिनेमातून संदीप साळवे व अक्षया हिंदळकर हे फ्रेश चेहरे रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहेत. या नव्या जोडीसोबत अशोक शिंदे, यतिन कार्येकर, क्रांती रेडकर, गणेश यादव, विनीत शर्मा, स्वप्निल राज शेखर, दीप्ती भागवत या कलाकारांच्या भूमिका आहेत.

Web Title: Rahul Dev will be seen in Marathi cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.