हंटरनंतर राधिका आपटेचा ‘पार्च्ड’
By Admin | Updated: January 31, 2016 02:41 IST2016-01-31T02:41:56+5:302016-01-31T02:41:56+5:30
लय भारी या चित्रपटानंतर राधिकाची गाडी सुसाट निघाली व ती मराठीसह बॉलीवूड, हॉलीवूड या चित्रपटसृष्टीपर्यंत थेट पोहोचलेली दिसते. आता हेच पाहा, हंटर व या चित्रपटानंतर राधिका आपटे थेट

हंटरनंतर राधिका आपटेचा ‘पार्च्ड’
लय भारी या चित्रपटानंतर राधिकाची गाडी सुसाट निघाली व ती मराठीसह बॉलीवूड, हॉलीवूड या चित्रपटसृष्टीपर्यंत थेट पोहोचलेली दिसते. आता हेच पाहा, हंटर व या चित्रपटानंतर राधिका आपटे थेट दिसणार ‘पार्च्ड’ या बॉलीवूड चित्रपटात. हा चित्रपट राजस्थानमध्ये राहणाऱ्या चार महिलांच्या जीवनावर आधारित असणार आहे. महिलांची संघर्षमय कथा यामध्ये पाहायला मिळणार आहे. महिलांना या पुरुषप्रधान संस्कृतीत स्वत:ची वैयक्तिक ओळख निर्माण करण्यासाठी किती मेहनत करावी लागते, म्हणजेच थोडक्यात महिलांचे समाजात असणारे दुय्यम स्थान याचे प्रतिबिंबच या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
तसे पाहता, महिलांच्या संघर्षमय परिस्थितीवर लज्जा, गुलाबगँग, लागा चुनरी में दाग असे अनेक चित्रपट बॉलीवूडने दिले आहेत. पण समाजाने या चित्रपटाकडून काही मिळविला असेल तर तो शून्य. असो अपेक्षा करूयात, की लीना यादव दिग्दर्शित पार्च्ड हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भावेल व समाजातदेखील महिलांचे प्रश्न मार्गी लागतील. तसेच या चित्रपटात राधिका आपटेसोबत तनिष्ठा चॅटर्जी, सुरवीन चावला, आदिल हुसैन व लेहर खान या कलाकारांचा समावेश आहे. या चित्रपटाचा प्रीमिअर टोरँटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखविण्यात आला आहे.