राधेचा लूक ‘बरेली की बर्फी’तील आयुष्यमान खुराणावर आधारित!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 12:02 PM2018-05-03T12:02:22+5:302018-05-03T17:32:22+5:30

देखण्या गौरव सरीनने साकारलेल्या राधेच्या भूमिकेमुळे ‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ या मालिकेची प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. या ...

Radhe's Luk 'Bareilly Ki Barfi' based on the life span! | राधेचा लूक ‘बरेली की बर्फी’तील आयुष्यमान खुराणावर आधारित!

राधेचा लूक ‘बरेली की बर्फी’तील आयुष्यमान खुराणावर आधारित!

googlenewsNext
खण्या गौरव सरीनने साकारलेल्या राधेच्या भूमिकेमुळे ‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ या मालिकेची प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. या मालिकेतील आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी, विशेषत: तिच्या ‘लूक’ला न्याय देण्यासाठी गौरवने कोणतीही कसर शिल्लक ठेवलेली नाही.‘कृष्णा चली लंडन’ मालिकेतील राधेची वेशभूषा आणि लूक कसा असावा, याबाबत निर्मात्यांच्या मनात आधीच काही संकल्पना होत्या, असे सांगितले जाते. राधेचा वेश आणि लूक हा आयुष्यमान खुराणा याच्यासारखा असावा, असे निर्मात्यांचे मत होते. ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटातील आयुष्यमानच्या लूकवरच राधेचाही लूक आधारलेला आहे. मालिकेतील आपल्या वेशभूषेबद्दल गौरव सरीनने सांगितले, “होय, ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटातील आयुष्यमानच्या लूकवरच मालिकेतील माझा लूक आधारित आहे. ‘बरेली’तील आयुष्यमानच्या व्यक्तिरेखेतील काही गुणवैशिष्ट्यांचं माझ्या व्यक्तिरेखेशी साम्य असल्याने माझी रंगभूषा आणि वेशभूषाही त्याच्यासारखीच ठेवावी, अशा सूचना माझ्या स्टायलिस्ट आणि केशभूषाकारांना देण्यात आल्या होत्या. या लूकमध्ये प्रेक्षकांना मी कसा वाटतो, ते जाणून घेण्यास मी उत्सुक झालो आहे.” राधे हा कानपूरमध्ये राहणारा 21 वर्षांचा देखणा तरुण असतो. त्याच्या वयाच्या अन्य मुलांची स्वप्ने लक्षावधी रुपये कमाविणे, कंपनीत नोकरी करणे किंवा मित्रांबरोबर पार्टी करणे अशी स्वाभाविक असली, तरी राधेचे एकच स्वप्न असते.ते म्हणजे लग्न करणे! या मालिकेचा नायक राधे हा तसा स्वप्नाळू स्वभावाचा असून आपल्या पत्नीच्या शोधात असतो.


कृष्णा चली लंडन या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. या प्रोमोमध्ये राधे आपली स्वत:ची माहिती देत असून त्याचा मित्र साजन ती मोबाईलवर रेकॉर्ड करत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी राधेची ओळख जाणून घेण्यासाठी त्याला काही प्रश्न विचारले जात आहेत. यात त्याचे ‘नाव’, ‘काम’, ‘आपल्या पायावर उभा आहे की नाही?’ यासारख्या प्रश्नांची उत्तरे तो आपल्याला देताना दिसत आहे. या प्रोमोच्या अखेरीस राधे आपली ही ओळख करून देणारा व्हिडिओ अनेक मुलींना पाठवतो आणि त्यासोबत एक प्रश्नही विचारतो, “है कोई नजर में?” कृष्णा चली लंडन या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस येऊन काहीच दिवस झाले असले तरी या प्रोमोला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: Radhe's Luk 'Bareilly Ki Barfi' based on the life span!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.