"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 14:22 IST2025-08-02T14:21:43+5:302025-08-02T14:22:03+5:30

'रांझणा' चा AI क्लायमॅक्स, थिएटरमधला व्हिडिओ व्हायरल

raanjhanaa movie AI altered climax theatre video goes viral netizens react | "...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट

"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट

२०१३ मध्ये प्रदर्शित झालेला आणि आजही अनेकांच्या हृदयात विशेष स्थान असलेला चित्रपट 'रांझणा' (Raanjhanaa) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा सिनेमा थिएटरमध्ये रि-रिलीज झाला आहे. धनुष आणि सोनम कपूर यांची सिनेमात मुख्य भूमिका होती. सिनेमातील गोष्ट, यातील गाणी, कलाकारांचा अभिनय सगळंच प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं. दरम्यान सिनेमाच्या तमिळ रिलीजमध्ये सिनेमाचा शेवट चक्क AI ने दाखवण्यात आला आहे. यामध्ये कुंदनचा मृत्यू न होता तो पुन्हा जागा होतो असा क्लायमॅक्स दाखवण्यात आला आहे. थिएटरमधला हा AI व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.

चित्रपटातील प्रमुख पात्र कुंदनचा मृत्यू होतो. या क्लायमॅक्स सीनमधला धनुषचा मोनोलॉग तर आजही प्रेक्षकांना रडवतो. मात्र हाच क्लायमॅक्स तमिळ व्हर्जनमध्ये बदलून दाखवण्यात येत आहे. थिएटरमध्ये क्लायमॅक्सचा सीन भलताच दिसत आहे. AI ने हा बनवला आहे. यामध्ये कुंदन डोळे उघडतो, बाहेर बसलेले बिंदिया आणि मुरारी खूश होतात. असा तो सीन आहे. हे पाहून थिएटरमधील प्रेक्षक अक्षरश: टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट करत आहेत.

या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. 'हा क्लायमॅक्स दाखवून काय सिद्ध केलं?','मी हे पाहण्यासाठी तयार नाही','सिनेमातला शेवटचा डायलॉग हेच सिनेमाचं वैशिष्ट्य होतं' अशा कमेंट्स व्हिडिओवर आल्या आहेत.

आनंद एल राय यांनी AI आधारित नवीन क्लायमॅक्सविषयी सोशल मीडियावरून माहिती मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. या निर्णयामध्ये त्यांचा काहीही सहभाग नव्हता, हेही स्पष्ट केलं. या क्लायमॅक्सचा तीव्र निषेध करत आनंद एल राय यांनी 'रांझणा'च्या AI आवृत्तीतून स्वतःचं नाव हटवण्याची विनंती केली आहे. द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना ते म्हणतात, "ही एआय-सुधारित आवृत्ती माझ्या मूळ कल्पनांविरुद्ध आहे. त्यामुळे मी यापासून स्वतःला वेगळं करतो". सध्या चित्रपटाचे हक्क तमिळनाडूतील 'अपस्विंग एंटरटेनमेंट' या वितरकाकडे असून इरॉस इंटरनॅशनलने हा निर्णय पूर्णतः व्यावसायिक फायद्यासाठी घेतल्याचा आरोप आनंद एल राय यांनी केला आहे. ते म्हणाले, "भावनांना पूर्णतः दुर्लक्षित करत हा निर्णय घेतला गेला आहे". 

Web Title: raanjhanaa movie AI altered climax theatre video goes viral netizens react

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.