पुष्करची साऊथमध्ये एंट्री
By Admin | Updated: August 27, 2016 02:07 IST2016-08-27T02:07:16+5:302016-08-27T02:07:16+5:30
साऊथच्या माल-मसाला असणाऱ्या चित्रपटांचे मराठमोळ्या प्रेक्षकांनाही चांगलेच वेड लागले आहे.

पुष्करची साऊथमध्ये एंट्री
साऊथच्या माल-मसाला असणाऱ्या चित्रपटांचे मराठमोळ्या प्रेक्षकांनाही चांगलेच वेड लागले आहे. त्यामुळेच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक मराठीत होऊ लागले आहेत. सध्या आपले अनेक मराठी कलाकारदेखील अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम करत आहेत. नेहा पेंडसे, श्रृती मराठे, सुबोध भावे या कलाकारांनंतर आता अभिनेता पुष्कर जोग दाक्षिणात्य चित्रपटात पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. गजनी, हॉलिडेसारख्या बॉलिवूड चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे नामवंत दिग्दर्शक ए.आर मुरूगदास यांच्या चित्रपटात पुष्कर झळकणार असल्याचे कळतेय. मुरूगदास हे नेहमीच वेगळ्या शैलीचे चित्रपट करण्यासाठी ओळखले जातात. आमिर खान, अक्षय कुमार या बॉलिवूडमधील तगड्या कलाकारांसोबत काम केल्यानंतर ते मराठमोळ्या पुष्करला साऊथमध्ये संधी देणार आहेत. या चित्रपटामध्ये संजय दत्तने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारावी अशी त्यांची इच्छा आहे. याकरता पुष्कर जोग आणि मुरूगदास यांनी नुकतीच संजय दत्तची भेटदेखील घेतली. आता फक्त संजूबाबाच्या होकाराच्या प्रतिक्षेत ते आहेत.
या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री पुष्करसोबत झळकणार आहे. लवकरच अभिनेत्रीची निवड होणार असल्याचे समजतेय. या तेलगू चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे.