सायशा आता टायगरसोबत
By Admin | Updated: November 22, 2014 01:44 IST2014-11-22T01:44:53+5:302014-11-22T01:44:53+5:30
दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची भाची सायशा अजय देवगणसोबत तिच्या करिअरची सुरुवात करीत आहे.

सायशा आता टायगरसोबत
दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची भाची सायशा अजय देवगणसोबत तिच्या करिअरची सुरुवात करीत आहे. आता ताजी बातमी अशी की, तिला तिच्या दुसऱ्या चित्रपटाचीही आॅफर मिळाली आहे. बालाजी प्रोडक्शनने सायशाला टायगर श्रॉफसोबत एका चित्रपटासाठी साईन केले आहे. हा चित्रपट सुपरहीरो चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. सायशासाठी ही एक चांगली संधी आहे, कारण तिला तिच्या वयाच्या हीरोसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसुजा करणार असून हा एक थ्रीडी चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी सुरू होईल. लॅटिन आणि कथ्थक डान्समध्ये प्रावीण्य मिळवणारी सायशा अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्याची अपेक्षा आहे.