इंटरनेटवर उडवली जातेय प्रियंकाची खिल्ली...
By Admin | Updated: June 22, 2016 02:03 IST2016-06-22T02:03:55+5:302016-06-22T02:03:55+5:30
आजच्या इंटरनेटयुगात सेलिब्रिटींच्या प्रत्येक गोष्टींवर कॉमेंट केले जाते. नेट भाषेत सांगायचे तर ‘ट्रोलिंग’ केली जाते. अशीच ट्रोलिंग बिचाऱ्या ‘देसी गर्ल’ प्रियंका चोपडाला सहन करावी लागत आहेत.

इंटरनेटवर उडवली जातेय प्रियंकाची खिल्ली...
आजच्या इंटरनेटयुगात सेलिब्रिटींच्या प्रत्येक गोष्टींवर कॉमेंट केले जाते. नेट भाषेत सांगायचे तर ‘ट्रोलिंग’ केली जाते. अशीच ट्रोलिंग बिचाऱ्या ‘देसी गर्ल’ प्रियंका चोपडाला सहन करावी लागत आहेत. क्वांटिको मालिकेत काम केल्यावर ती आंतरराष्ट्रीय सेलीब्रेटी म्हणून ओळखली जाऊ लागली. ‘मॅक्झिम’ नावाच्या एका नावाजलेल्या इंग्लिश मॅगझिनने तिला तर ‘हॉटेस्ट वुमन इन द वर्ल्ड’ घोषित केले. याच मॅगझिनच्या मुखपृष्ठावरील तिच्या फोटोची सध्या इंटरनेटवर खिल्ली उडविली जात आहे. या कव्हर फोटोमध्ये तिचे सौंदर्य अधिक खुलवून दाखविण्यासाठी फोटोशॉप इफेक्ट्सचा भरपूर प्रमाणात वापर करण्यात आल्याने सोशल मीडियावर ‘ट्रोलिंग’ला ऊत आला आहे. खासकरून तिचे आर्मपिट्स एवढे स्मूद कसे काय, असा सवाल ट्विटरवर विचारला जात आहे. एकाने ट्विट केले की, फोटोशॉप करून तर कोणीही हॉट दिसू शकते. प्रियंकाने याबाबत अद्यापही प्रतिक्रिया दिलेली नाही.