प्रियंकाच्या अभिनयाची परीक्षा
By Admin | Updated: December 3, 2014 01:51 IST2014-12-03T01:51:18+5:302014-12-03T01:51:18+5:30
राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या संजय लीला भन्साळी यांचा ‘बाजीराव मस्तानी’ हा प्रियंकाचा पहिलाच ऐतिहासिक चित्रपटात काम करीत आहे.

प्रियंकाच्या अभिनयाची परीक्षा
राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या संजय लीला भन्साळी यांचा ‘बाजीराव मस्तानी’ हा प्रियंकाचा पहिलाच ऐतिहासिक चित्रपटात काम करीत आहे. या चित्रपटातील भूमिका निभावणे खूपच अवघड काम असल्याचे प्रियंका मानते. असणार आहे. याबाबत प्रियंका म्हणते की, मी पहिल्यांदाच एखाद्या ऐतिहासिक चित्रपटात काम करीत आहे. ५०० वर्षांपूर्वीची कथा सांगणाऱ्या एखाद्या चित्रपटात काम करणे फारच अवघड असते. आजवरच्या सर्व भूमिकांपैकी या चित्रपटातील काशीबाईची भूमिका सर्वांत कठीण आहे, कारण ही एक वेगळ्या काळातील स्त्री आहे. त्या दरम्यानची संस्कृती समजून ही भूमिका साकारणे आव्हानात्मक आहे. त्यामुळे ही भूमिका अभिनेत्री म्हणून माझी परीक्षा घेत आहे, असे मला वाटते.’ चित्रपटात प्रियंका पेशवे बाजीरावच्या पत्नीच्या भूमिकेत आहे.