जगातील सुंदर महिलांमध्ये प्रियंका दुसऱ्या स्थानी

By Admin | Updated: April 3, 2017 18:29 IST2017-04-03T18:05:32+5:302017-04-03T18:29:41+5:30

प्रियांकाने अँजेलिना जोली, एमा वॉट्सन, एमा स्टोन, मिशेल ओबामा, गिगि हॅडिड यांना मागे टाकून दुसरे स्थान पटकावले. ३४ वर्षीय प्रियांकाने ट्विट करून तिचा आनंद व्यक्त करत सर्वांचे आभार मानले आहेत.

Priyanka ranked second among the world's finest women | जगातील सुंदर महिलांमध्ये प्रियंका दुसऱ्या स्थानी

जगातील सुंदर महिलांमध्ये प्रियंका दुसऱ्या स्थानी

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - बॉलिवूडची "देसी गर्ल" प्रियांका चोप्राने हॉलिवूडमध्येही आपले बस्तान बसवले आहे. प्रियांका चोप्रा जगातील दुसरी सर्वाधिक सुंदर महिला बनली आहे. Buzznetने केलेल्या सर्वेक्षणात जगातील सर्वाधिक सुंदर महिलांच्या यादीत प्रियांकाने दुस-या क्रमांक मिळवला आहे. या यादीत पहिल्या स्थानावर पॉप मॉडल बियॉन्से आहे. तर तिस-या क्रमांकारवर मॉडेल ट्रेलर हिल आहे.
मोस्ट ब्युटिफुल वूमेनच्या क्रमवारीबद्दल आणखी सांगायचे तर या यादीत चौथे स्थान एमा वॉटसनने मिळवले आहे. पाचव्या क्रमांकावर फिफ्टी शेड्स डार्करची अभिनेत्री डकोटा जॉनसन आहे. डकोटा ही अमेरिकन मॉडेल व अ‍ॅक्ट्रेस आहे. अँजोलिना जोली या यादीत आठव्या क्रमांकावर आहे.
प्रियांकाने सोशल मीडियावर हा आनंद तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तिने Buzznetचे आभार मानले असून हे स्थान मिळवून देण्यासाठी तिला मतदान करणा-यांचेही आभार व्यक्त केले आहे. शिवाय बियॉन्से माझ्या यादीत सुद्धा नंबर एकवर आहे, असे तिने म्हटले आहे. अँजोलिना जोली हिच्यासारख्या हॉलिवूड सौंदर्यवतीला मागे टाकून प्रियांकाने हे स्थान मिळवले आहे. त्यामुळेच तिचे हे यश प्रशंसेस पात्र आहे.

प्रियांकाने इन माय सिटी अ‍ॅण्ड एक्झॉटिक या गाण्याने भारताबाहेर प्रसिद्धी मिळवली. याच गाण्यानंतर तिला क्वांटिको या अमेरिकी टीव्ही मालिकेत मुख्य भूमिका मिळाली. अ‍ॅलेक्स पॅरिश या भूमिकेने प्रियांकाने सर्वांचीच मने जिंकली आहेत. टेलिव्हिजन जगतातील या दोन वर्षांच्या कारकिर्दीत तिला दोनदा पिपल्स चॉइस अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. प्रियांका लवकरच बेवॉच चित्रपटाद्वारे हॉलिवूड डेब्यू करणार आहे.

Web Title: Priyanka ranked second among the world's finest women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.