बाजीराव मस्तानीबाबत प्रियंका उत्साहित
By Admin | Updated: October 11, 2014 04:45 IST2014-10-11T04:45:01+5:302014-10-11T04:45:01+5:30
बॉलीवूडची देसी गर्ल अशी ओळख असलेली प्रियंका चोप्रा बाजीराव मस्तानी या चित्रपटाबाबत उत्साहित आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे

बाजीराव मस्तानीबाबत प्रियंका उत्साहित
बॉलीवूडची देसी गर्ल अशी ओळख असलेली प्रियंका चोप्रा बाजीराव मस्तानी या चित्रपटाबाबत उत्साहित आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. मेरी कॉम या चित्रपटानंतर संजय लीला भन्साळी बाजीराव मस्तानीची निर्मिती करीत आहेत. हा चित्रपट पेशवे बाजीराव आणि त्यांची प्रेयसी मस्तानीवर आधारित आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि प्रियंका चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. प्रियंका म्हणते की, ती चित्रपटाबाबत खूप उत्साहित आहे आणि घाबरलेलीही आहे. प्रियंकाने टिष्ट्वटरवर लिहिले की, ‘कधी कधी काहीतरी सुरू करणे खूपच भीतीदायक असते. मला क्षणभरासाठीही नव्याने सुरुवात केल्याचा अनुभव झाला नाही. मी खूप उत्साहित आहे आणि पूर्णपणे घाबरलेलीही आहे.’