आता मॅडमजी बनणार प्रियंका
By Admin | Updated: November 2, 2014 00:52 IST2014-11-02T00:52:03+5:302014-11-02T00:52:03+5:30
‘मेरी कोम’ हा चित्रपट रिलीज झाला असून, प्रियंका चोप्रा आता ‘बाजीराव मस्तानी’चे शूटिंग करीत आहे. लवकरच ती मधुर भांडारकरच्या ‘मॅडमजी’चे चित्रीकरणही सुरू करणार आहे.
आता मॅडमजी बनणार प्रियंका
‘मेरी कोम’ हा चित्रपट रिलीज झाला असून, प्रियंका चोप्रा आता ‘बाजीराव मस्तानी’चे शूटिंग करीत आहे. लवकरच ती मधुर भांडारकरच्या ‘मॅडमजी’चे चित्रीकरणही सुरू करणार आहे. मधुरच्या फॅशन या चित्रपटात प्रियंकाने याआधी काम केले आहे. या चित्रपटासाठी प्रियंकाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. ‘मॅडमजी’चे चित्रीकरण नोव्हेंबरमध्ये सुरू होत आहे. प्रियंकाच्या या भूमिकेबाबत तिचे चाहते खूप उत्साहित आहेत. ‘मॅडमजी’मध्ये एका मुलीचा संघर्ष दाखविण्यात येणार आहे. चित्रपट अनेक शहरांमध्ये शूट केला जाणार आहे. ‘मॅडमजी’ हा पहिलाच चित्रपट आहे, ज्याच्या निर्मितीची जबाबदारीही प्रियंकाने घेतली आहे. ‘मेरी कॉम’प्रमाणोच हा चित्रपटही महत्त्वाचा असल्याचे प्रियंका मानते.