प्रियदर्शन जाधव करणार चला हवा येऊ द्याचे सूत्रसंचालन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2017 13:43 IST2017-02-03T08:13:29+5:302017-02-03T13:43:29+5:30
प्रेक्षकांना खळखळून हसविणारा चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. त्याचबरोबर या शोेची जान ...

प्रियदर्शन जाधव करणार चला हवा येऊ द्याचे सूत्रसंचालन
प रेक्षकांना खळखळून हसविणारा चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. त्याचबरोबर या शोेची जान असणारा सूत्रसंचालक निलेश साबळे याने प्रेक्षकांचे मनं जिंकले आहे. मात्र निलेशच्या चाहत्यांसाठी निराशाजानक बातमी आहे. निलेश आता काही दिवस चला हवा येऊ द्या या कार्यक्रमापासून दूर राहणार आहे. सध्या काही दिवस तरी त्याच्या जागी मराठी चित्रपटसृष्टीचा अभिनेता प्रियदर्शन जाधव याची वर्णी लागली आहे.
त्याची प्रकृती बिघडली असल्या कारणाने कमीतकमी महिनाभर तरी निलेशला चित्रीकरणात सहभाग घेता येणार नाही. त्याचे उपचार सुरू असले तरी डॉक्टरांनी काही आठवडे त्याला सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितली आहे. त्यामुळे काही भागांपुरत्या शोचे सूत्रसंचलन अभिनेता प्रियदर्शन जाधवकडे देण्यात आले आहे.
गेले तीन वर्षे सातत्याने प्रेक्षकांसमोर अत्यंत रंजक पद्धतीने चला हवा येऊ द्या हा शो डॉ. निलेश साबळे आणि त्यांची टीम सादर करत आहे. या तीन वर्षांत पहिल्यांदाच काही भागांपुरता का होईना निलेश शोपासून दूर असणार आहे. मात्र त्याची उणीव आता प्रियदर्शन भरूण काढणार आहे. प्रियदर्शनने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनं जिंकले आहे. त्याने टाइमपास २, विजय असो, चिंटू २ असे अनेक चित्रपट केले आहेत. तसेच त्याचा सायकल हा चित्रपटदेखील प्रदर्शनास सज्ज झाला आहे. प्रकाश कुंटे दिग्दर्शित हा चित्रपट आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेता ऋषीकेश जोशीदेखील पाहायला मिळणार आहे. तसेच तो नाटकाच्या माध्यमातूनदेखील रंगभूमीवर आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत असतो.