प्रिया बापटची स्टाइल भावतेय!

By Admin | Updated: May 24, 2017 00:36 IST2017-05-24T00:36:02+5:302017-05-24T00:36:02+5:30

बॉलिवूडमध्ये ‘स्टाइल आयकॉन’ म्हणून सोनम कपूर ओळखली जाते. जेव्हा-जेव्हा सोनम वेगवेगळ्या लुकमध्ये रेड कार्पेटवर येते, तेव्हा साऱ्यांच्या नजरा फक्त आणि फक्त सोनम कपूरकडेच वळलेल्या दिसतात

Priya Bapatike style! | प्रिया बापटची स्टाइल भावतेय!

प्रिया बापटची स्टाइल भावतेय!

बॉलिवूडमध्ये ‘स्टाइल आयकॉन’ म्हणून सोनम कपूर ओळखली जाते. जेव्हा-जेव्हा सोनम वेगवेगळ्या लुकमध्ये रेड कार्पेटवर येते, तेव्हा साऱ्यांच्या नजरा फक्त आणि फक्त सोनम कपूरकडेच वळलेल्या दिसतात. असेच काही आता मराठी सिनेसृष्टीतही होताना दिसत आहे. अगदी बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणेच मराठी सिनेसृष्टीत स्टाइल आॅयकॉन म्हणून प्रिया बापट ही अभिनेत्री आपली वेगळी ओळख निर्माण करताना दिसतेय. सोशल मीडियावर प्रिया बापटच्या सिनेमांची तर चर्चा होतेच. मात्र, आता तिच्या फॅशन सेन्सची चर्चा होत आहे. रुपेरी पडद्यावर विविधारंगी भूमिका साकारून अभिनेत्री प्रिया बापटची रसिकांची मनं जिंकलीत. तिची प्रत्येक अदा जितकी रसिकांना घायाळ करणारी असते तितकीच तिची स्टाइलही खास ठरते. सोशल मीडियावर ती खूप अ‍ॅक्टिव्ह असून तिच्या सगळ्या घडमोडींची अपडेट ती देत असते. तिने शेअर केलेले ग्लॅमरस फोटोंमुळे तिला खूप चांगल्या-चांगल्या प्रतिक्रिया रसिकांकडून मिळत असतात. विशेष म्हणजे, तिच्या ड्रेसिंग स्टाइलचे खूप कौतुक होत आहे. तिचे चाहते तिला स्टाईल आॅयकॉन म्हणून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

Web Title: Priya Bapatike style!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.