भरकटलेल्या पटकथेतला प्रेमपट

By Admin | Updated: February 15, 2016 01:25 IST2016-02-15T01:25:27+5:302016-02-15T01:25:27+5:30

एकेकाळी काश्मिरी परंपरा आणि संस्कृतीच्या पार्श्वभूमीवरील चित्रपटांचा धूमधडाका असायचा. चार्ल्स डिकेन्सच्या ‘ग्रेट एक्सपेक्टेशन्स’ या कादंबरीवर आधारित दिग्दर्शक अभिषेक कपूर यांचा

Premtak in the strayed roundabout | भरकटलेल्या पटकथेतला प्रेमपट

भरकटलेल्या पटकथेतला प्रेमपट

एकेकाळी काश्मिरी परंपरा आणि संस्कृतीच्या पार्श्वभूमीवरील चित्रपटांचा धूमधडाका असायचा. चार्ल्स डिकेन्सच्या ‘ग्रेट एक्सपेक्टेशन्स’ या कादंबरीवर आधारित दिग्दर्शक अभिषेक कपूर यांचा ‘फितूर’ हा चित्रपट मात्र कादंबरी आणि पटकथेच्या वास्तवातील दरीत फसला, एवढेच नाही तर दुबळा होत गेला.
काश्मीरच्या श्रीनगरातील नूर (आदित्य रॉय कपूर) आणि फिरदौस (कतरिना कैफ) यांच्या बालपणातील प्रेमाने या चित्रपटाची सुरुवात होते. नूर सर्वसामान्य कुटुंबातील, तर फिरदौस श्रीमंत कुटुंबातील असते. नूरला लहानपणापासून चित्रकलेची आवड असते. पहिल्याच भेटीत नूर फिरदौसचे चित्र काढायला लागतो. तिचे पालनपोषण करणारी बेगम (तब्बू) विरहामुळे दु:खी असते. बेगम फिरदौसला शिक्षणासाठी लंडनला पाठविते. इकडे फिरदौसच्या ओढीने नूर मोठा होतो. चित्रकार म्हणून
त्याला मोठी संंधी मिळाल्याने तो दिल्लीला जातो. तेथे फिरदौस त्याला भेटते. लंडनमध्ये फिरदौसची बिलालशी (राहुल भट्ट) मैत्री होते. तो पाकिस्तानी असतो. त्याच्याशी विवाहबद्ध होण्याची फिरदौसची इच्छा असते. तथापि, नूरच्या प्रेमामुळे तिचे मन यासाठी धजत नाही. बिलाल आणि फिरदौस यांच्यातील मैत्रीने नूर त्रस्त होतो. चित्रकलेच्या दुनियेतील एक मोठी संधी तो गमावून बसतो. निराशेमुळे तो पुन्हा श्रीनगरला परततो. तेथे पुन्हा फिरदौस त्याच्या सामोरी येते. तिला पाहून नूरला आनंद होतो. त्याला पुन्हा चित्रकलेचे कसब दाखविण्याची आणखी एक मोठी संधी मिळते. त्यासाठी तो लंडनला जातो. तेथेही फिरदौसचे प्रेम आणि बेगमचे दु:ख त्याचा पिच्छा सोडत नाही. धोका आणि कट यावर अखेर नूर आणि फिरदौस यांच्या प्रेमाची सरशी होते.
उणिवा : चित्रपटासाठी निवडलेली कादंबरी अद्भुत असली तरी त्यावर आधारित चित्रपट त्या तोडीचा नाही. लहानपण ते तारुण्यापर्यंतची प्रेमकथा यातील गोंधळामुळे काहीच उमजत नाही. फिरदौसची एका घडीला बिलालशी जवळीक होते, तर दुसऱ्या घडीला तिला नूरची ओढ लागते. बेगमचे पात्र पूूर्वायुष्यातून बाहेर पडत नाही. पाहुण्या कलाकार म्हणून लारा दत्ता आणि आदिती राव हैदरी यांची पात्रेही फारशी भावत नाहीत. चित्रपटाचा वेग अतिशय मंद असल्याने तो कंटाळवाणा वाटतो.वैशिष्ट्ये : तब्बूचा दमदार अभिनय आहे. तांत्रिकदृष्ट्याही चित्रपट चांगला झाला आहे. कॅमेऱ्याची कमाल आणि चित्रणस्थळामुळे चित्रपटाला भव्यता प्राप्त होते. चित्रपटाचे संगीत बरे आहे.
का पाहावा :
तब्बूच्या कसदार अभिनयासाठी.
का पाहू नये :
कमकुवत पटकथा लेखन आणि दुबळी पात्रे.
एकूणच व्हॅलेंटाइन डेचे औचित्य साधून चित्रपट पाहणाऱ्यांच्या पदरी निराशा येईल. सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी तर यात काहीच नाही.

Web Title: Premtak in the strayed roundabout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.