चष्मेबद्दूर प्रार्थना
By Admin | Updated: August 7, 2016 02:38 IST2016-08-07T02:38:00+5:302016-08-07T02:38:00+5:30
कॉफी आणि बरंच काही, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, मितवा या चित्रपटांमध्ये एकदम ग्लॅमरस अंदाजात प्रार्थना बेहेरे प्रेक्षकांना दिसली. आता एका वेगळ्या अंदाजात ती प्रेक्षकांसमोर

चष्मेबद्दूर प्रार्थना
कॉफी आणि बरंच काही, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, मितवा या चित्रपटांमध्ये एकदम ग्लॅमरस अंदाजात प्रार्थना बेहेरे प्रेक्षकांना दिसली. आता एका वेगळ्या अंदाजात ती प्रेक्षकांसमोर येत आहे. चष्मेबद्दूर प्रार्थना... तीही एकदम सिंपल...
जालिंधर कुंभार दिग्दर्शित ‘रेडिमिक्स’ या सिनेमामध्ये प्रार्थना सिंपल लूकमध्ये दिसणार आहे. कुरळे केस आणि डोळ्यांवर भला मोठा चष्मा असलेली प्रार्थना वैभव तत्त्ववादीसोबत झळकणार आहे. ‘लोकमत सीएनएक्स’सोबत बोलताना प्रार्थनाने तिच्या या लूकविषयी सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींचा उलगडा केला. ती म्हणाली, ‘मला खरे तर असे सिंपलच राहायला जास्त आवडते. मी आतापर्यंत जे चित्रपट केले, त्यामध्ये खूपच मेकअप असलेल्या ग्लॅमरस भूमिका करायला मिळाल्या होत्या. पण पवित्र रिश्ता या मालिकेमध्ये चाळीमध्ये राहणाऱ्या मुलीची भूमिका मी केली होती. त्या वेळी साधी लिपस्टिकही मला लावता आली नव्हते.
‘रेडिमिक्स’ या चित्रपटातही मी एकदम साधी राहणारी मुलगी असते. या मुलीला स्वत:कडे पाहायलासुद्धा वेळ नसतो. मला या भूमिकेत खरोखरच खूप मजा आली. याचे कारण म्हणजे, मला जास्त मेकअप करायला किंवा सजायला मुळीच आवडत नाही.
नेहमीच्या आयुष्यातही मी साधी राहते. अनेकांना प्रश्न पडतो
की, हीरॉईन इतकी साधी कशी?
‘रेडिमिक्स’ या चित्रपटात नेहा जोशीने प्रार्थनाच्या बहिणीचा रोल केला आहे. ही पुण्यात घडणारी गोष्ट असून, एक वेगळ्या प्रकारची प्रेमकथा आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीत आहे.
- priyanka.londhe@lokmat.com