Prasad Oak : "तू मला भरभरून दिलंस..", सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी प्रसाद ओकनं शेअर केला खास व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 03:50 PM2022-12-31T15:50:02+5:302022-12-31T15:53:28+5:30

Prasad Oak : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मराठी अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकनं एक खास व्हिडीओ.

Prasad Oak shared a special video on social media | Prasad Oak : "तू मला भरभरून दिलंस..", सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी प्रसाद ओकनं शेअर केला खास व्हिडीओ

Prasad Oak : "तू मला भरभरून दिलंस..", सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी प्रसाद ओकनं शेअर केला खास व्हिडीओ

googlenewsNext

आज 2022 चा अखेरचा दिवस आहे. देशभरात नव्या वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषाची जोरदार तयारी सुरू आहे. काही सेलिब्रेटी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी परदेशात गेलंत तर काही देशातच फिरतात. दरम्यान २०२२ला निरोप देण्यासाठी मराठी अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकनं एक खास व्हिडीओ. या व्हिडीओत प्रसादनं संपूर्ण वर्षाची झलक शेअर केली आहे. यात धर्मवीर ते चंद्रामुखीपर्यंतच्या सिनेमाची संपूर्ण झलक दिसतेय. 

प्रसादने शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. हा व्हिडीओ शेअर करताना प्रसादनं लिहिले, प्रिय 2022...तू मला भरभरून दिलंस...!!! मी तुला कधीही विसरू शकणार नाही...माझ्या आयुष्यात कायमच तू “सोनेरी वर्ष” म्हणून राहशील...!!! काळजी घे... आणि तुझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद 2023 कडे अलगद पोहोचव आणि त्याला सांग माझ्यावरचं प्रेम आणि आशीर्वाद तुझ्यासारखं कायम ठेव म्हणावं...!!!  प्रिय 2023  तुझं अत्यंत मनःपूर्वक स्वागत सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण कर आणि सगळ्यांचं आरोग्य उत्तम ठेव रे मित्रा...!!! 

2022 हे वर्ष प्रसादसाठी सर्व अर्थाने यशस्वी ठरले. याचवर्षी आलेल्या त्याच्या 'धर्मवीर' सिनेमा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. या सिनेमात प्रसादनं साकारलेले आनंद दिघे लोकांना भावले. प्रसादच्या ‘धर्मवीर’ या सिनेमातील भूमिकेचं खूपच कौतुक झालं. तर त्याने दिग्दर्शित केलेल्या चंद्रमुखी या सिनेमाला देखील रसिकांचं प्रेम मिळालं.  प्रसादचा ‘धर्मवीर 2’ सिनेमाची ही अधिकृत घोषणा झाली आहे. त्यामुळे २०२३मध्ये प्रसाद ओकच्या अभिनय कौशल्याची जादू प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता येणार आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद तसेच दिग्दर्शन प्रवीण तरडे यांचे आहे.


 

Web Title: Prasad Oak shared a special video on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.