आलियाची स्तुतिसुमने
By Admin | Updated: May 15, 2015 00:13 IST2015-05-14T23:09:51+5:302015-05-15T00:13:14+5:30
एकाच इंडस्ट्रीतील दोन अभिनेत्री एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी असू शकतात का, असा प्रश्न सर्वांना नेहमीच पडतो. सिनेसृष्टीत असलेली अटीतटीची

आलियाची स्तुतिसुमने
एकाच इंडस्ट्रीतील दोन अभिनेत्री एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी असू शकतात का, असा प्रश्न सर्वांना नेहमीच पडतो. सिनेसृष्टीत असलेली अटीतटीची स्पर्धा, एकमेकांवर कुरघोडी करण्याची चढाओढ नेहमीच पाहायला मिळते. मात्र आलिया भट आणि श्रद्धा कपूर यांची दोस्ती काही वेगळीच असल्याचे दिसून आले आहे. श्रद्धाच्या ‘एबीसीडी २’ चित्रपटातील ‘सुन साथिया’ गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. यात तिने केलेल्या नृत्याने भारावून गेलेल्या आलियाने श्रद्धासारखा डान्स कोणी करूच शकत नसल्याची दाद दिली आहे. आलियाने या स्तुतिसुमनांचा वर्षाव ट्विटरवर केला आहे.