प्रभावळकर-शिंदे पुन्हा एकत्र!
By Admin | Updated: May 24, 2015 23:39 IST2015-05-24T23:39:39+5:302015-05-24T23:39:39+5:30
श्रीयुत गंगाधर टिपरे’मधील आनंदी आणि विनोदी कुटुंब सगळ्यांच्याच मनात घर करून बसले आहे. ज्येष्ठ अभिनेते व लेखक दिलीप प्रभावळकर यांनी एका वृत्तपत्रात चालवलेल्या

प्रभावळकर-शिंदे पुन्हा एकत्र!
‘श्रीयुत गंगाधर टिपरे’मधील आनंदी आणि विनोदी कुटुंब सगळ्यांच्याच मनात घर करून बसले आहे. ज्येष्ठ अभिनेते व लेखक दिलीप प्रभावळकर यांनी एका वृत्तपत्रात चालवलेल्या स्तंभाचे पुस्तक झाले आणि नंतर त्या पुस्तकाची टीव्हीवरील मालिका. या वेगवेगळ्या माध्यमांतून फिरणाऱ्या या लेखनाला सातत्याने प्रेक्षकांची दाद मिळाली आहे. ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’च्या भरघोस यशानंतर आज अनेक वर्षांनी ‘अगं बाई अरेच्चा २’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा केदार शिंदे आणि दिलीप प्रभावळकर एकत्र आले आहेत. या चित्रपटाची कथा प्रभावळकरांच्या एका कथेवरून घेण्यात आली असून, त्याचा विस्तार केदार शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तोच खुसखुशीत विनोद आणि खुमासदार शैलीचा आनंद रसिकांना मिळत आहे. चित्रपट २२ मेपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.