तेजश्री प्रधान-उमेशची जमणार जोडी
By Admin | Updated: January 26, 2017 06:58 IST2017-01-26T06:58:43+5:302017-01-26T06:58:43+5:30
तेजश्री प्रधान आणि अभिनेता उमेश कामत दोघेही एका नवीन प्रोजेक्टसाठी एकत्र येणार असल्याचे समजतेय. दिग्दर्शक सुश्रुत भागवत यांनी फेसबुकवर तीन फोटो शेअर केले आहेत.

तेजश्री प्रधान-उमेशची जमणार जोडी
तेजश्री प्रधान आणि अभिनेता उमेश कामत दोघेही एका नवीन प्रोजेक्टसाठी एकत्र येणार असल्याचे समजतेय. दिग्दर्शक सुश्रुत भागवत यांनी फेसबुकवर तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपल्याला तेजश्री आणि उमेश हे दोघेही एकत्र पाहायला मिळतायत. एवढेच नाही तर या नवीन चित्रपटासाठी हे दोघेही वर्कशॉप घेत असल्याचे कळतेय. अभिनेत्री शर्वरी पिल्लईदेखील या सिनेमात आपल्याला दिसणार असल्याचे समजतेय. तसेच या चित्रपटात कदाचित आपल्याला उमेशचा एक हटके लूक दिसू शकतो. ‘रॉकस्टार’च्या भूमिकात जर या सिनेमातून उमेश प्रेक्षकांसमोर आला तर जास्त आश्चर्य वाटायला नको. कारण एका फोटोमध्ये उमेश गिटार हातात घेऊन वाजवताना दिसतोय.