सत्ताधा-यांनी आधी गरजूंना मदत करावी - सनी लिओन

By Admin | Updated: September 4, 2015 18:47 IST2015-09-04T10:05:10+5:302015-09-04T18:47:36+5:30

सनी लिओनच्या कंडोमच्या जाहिरातींमुळे बलात्कार वाढतील असे विधान करणा-या अतुलकुमार अंजान यांना सनी लिओनने सडेतोड उत्तर दिले आहे.

Powerful people should help the needy before - Sunny Leone | सत्ताधा-यांनी आधी गरजूंना मदत करावी - सनी लिओन

सत्ताधा-यांनी आधी गरजूंना मदत करावी - सनी लिओन

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ४ - सनी लिओनच्या कंडोमच्या जाहिरातींमुळे बलात्कार वाढतील असे विधान करणा-या अतुलकुमार अंजान सनी लिओनने सडेतोड उत्तर दिले आहे. सत्ताधा-यांनी माझ्यावर टीका करण्याऐवजी गरजूंना मदत करावी असा प्रत्युत्तर सनी लिओनने दिले आहे. 

भाकप नेते अतुलकुमार अंजान यांनी दोन दिवसांपूर्वी सनी लिओनच्या कंडोमच्या जाहिरातींवर आक्षेप घेतला होता. अशा बीभत्स जाहिरातींमुळे बलात्कार वाढतील अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली होती. सनी लिओनवर विविध राजकीय नेत्यांनी नेहमीच टीका केली आहे. अखेर या नेत्यांना सनी लिओनने ट्विटरव्दारे उत्तर दिले आहे. सनी लिओन व तिचा पती सध्या आफ्रिकेत असून गुरुवारी तिने एक ट्विट केले आहे. यात सनी म्हणते, सत्ताधारी नेते माझ्यावर टीका करण्यात वेळी खर्ची घालतात, याऐवजी त्यांनी गरजूंना मदत करायला हवी. 

दरम्यान, सनी लिओनवर वादग्रस्त विधान केल्याने अतुलकुमार अंजान यांच्यावर जोरदार टीका झाली होती. यानंतर त्यांनी विधानावर माफी मागितली होती. 

Web Title: Powerful people should help the needy before - Sunny Leone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.