चिन्मय मांडलेकरच्या पत्नीने केले या अभिनेत्रीचे फोटोशूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2017 03:18 IST2017-05-19T03:18:01+5:302017-05-19T03:18:01+5:30
मराठी कलाकार त्यांच्या अभिनयामुळे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतायत. आपल्या अभिनयाने या कलाकारांनी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली

चिन्मय मांडलेकरच्या पत्नीने केले या अभिनेत्रीचे फोटोशूट
मराठी कलाकार त्यांच्या अभिनयामुळे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतायत. आपल्या अभिनयाने या कलाकारांनी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेता असो किंवा अभिनेत्री त्यांची चर्चा तर कायम होतच असते; मात्र आता चित्रपटसृष्टीतल्या कलाकारांसह त्यांचे जोडीदारसुद्धा आपापल्या कामानं प्रसिद्धीच्या झोतात येत आहेत. अभिनेता चिन्मय मांडलेकरची पत्नी नेहा मांडलेकरने अभिनेत्री नेहा जोशीसह एक खास फोटोशूट केले आहे ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या फोटोशूटमध्ये नेहा जोशीची विविध छबी पाहायला मिळत आहेत. या
फोटोंमध्ये नेहाचा अंदाज ग्लॅमरस आहे. नेहाने टिपलेली नेहा जोशीची प्रत्येक छबी विशेष आणि हटके आहे. नेहा मांडलेकरच्या क्रिएटिव्हीला विशेष दाद दिली जाते आहे. शिवाय, त्यावर कौतुकाच्या कमेंटचा वर्षावही होतो आहे.