प्रेक्षकांसाठी खुशखबर! Netflix ने केली 'या' सुपरहिट ६ सिरीजच्या नव्या सीझनची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 19:57 IST2025-05-30T19:37:05+5:302025-05-30T19:57:50+5:30

Netflix चा धमाका! लवकरच येत आहेत 'या' सिरीजचे नवे सीझन

ओटीटी विश्वात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या Netflix ने एकामागून लोकप्रिय सिरीजच्या नव्या सीझनची घोषणा करत चाहत्यांना सरप्राइज़ दिलं. यामध्ये थ्रिलर, ड्रामा, क्राईम आणि फॅमिली एंटरटेनमेंट अशा विविध प्रकारच्या सिरीजचा समावेश आहे.

ब्लॅक वॉरंट (Black Warrant) या सिरीजचा पहिला सीझन प्रचंड लोकप्रिय ठरला होता. आता लवकरच या सिरीजचा दुसरा सीझन येत असल्याची अधिकृत घोषणा Netflix नं केली आहे.सुनील गुप्ता १९८० च्या दशकात तिहार तुरुंगाचे जेलर होते. त्यांचे अनुभव त्यांनी आणि पत्रकार सुनेत्रा चौधरी यांनी 'ब्लॅक वॉरंट : कन्फेशन्स ऑफ ए तिहार जेलर' या पुस्तकरूपाने जगासमोर आणले. त्यावर ही वेबमालिका आधारित आहे.

बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टर (Ishaan Khatter) आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांच्या 'द रॉयल्स' (The Royals ) या वेब सिरीजला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलंय. आता दुसऱ्या सीझनची घोषणा केली आहे. नेटफ्लिक्सनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर 'द रॉयल्स २' येत असल्याची माहिती दिली आहे.

'मामला लीगल है' (Maamla Legal Hai ) या कोर्टरूम ड्रामा शोचा पहिला सीझन २०२४ मध्ये प्रदर्शित झाला होता. एका वर्षानंतर, नेटफ्लिक्सने आता घोषणा केली आहे की त्याच्या दुसऱ्या सीझनचे शूटिंग देखील सुरू झाले आहे.

लोकप्रिय कॉमेडियन 'कपिल शर्मा' (Kapil Sharma) हा नेटफ्लिक्सवर 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या (The Great Indian Kapil Show) माध्यमातून नव्याने प्रेक्षकांना हसवतोय. या शोचे आतापर्यंत दोन यशस्वी सीझन पार पडले असून आता तिसऱ्या सीझनची (The Great Indian Kapil Sharma Show Season 3) अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

"राणा नायडू २" या सिरीजमध्ये राणा दग्गुबाती आणि व्यंकटेश दग्गुबाती हे प्रमुख भूमिकेत आहेत. ही मालिका १३ जून २०२५ रोजी Netflix वर प्रदर्शित होणार आहे.

कोरियन वेब सीरिज स्क्विड गेमने सर्वांनाच वेड लावलं. अलिकडे स्क्विड गेमचा दुसरा सीझन रिलीज झाला, ज्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. आता लवकरच निर्माचे स्क्विड गेम वेब सीरिजचा तिसरा सीझन घेऊन येत आहेत. स्क्विड गेम सीझन 3 आता २७ जून २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.