Heeramandi : मोलकरणीसोबतच्या इंटिमेट सीन्सवर सोनाक्षी सिन्हानं सोडलं मौन, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 05:35 PM2024-05-09T17:35:17+5:302024-05-09T17:40:15+5:30

Sonakshi Sinha on Heeramandi:संजय लीला भन्साळींची वेबसीरिज हीरामंडीमध्ये असे बरेच सीन आहेत, जे पाहून काही प्रेक्षक चकीत झाले आहेत. या सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हाने मोलकरणीसोबत इंटिमेट सीन दिले आहेत, जे चर्चेत आले आहेत. दरम्यान आता यावर अभिनेत्रीने मौन सोडले आहे.

हीरामंडी वेबसीरिजमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने फरीदनची भूमिका केली आहे. जी पुरूषांचा द्वेष करते. त्यामुळे दिग्दर्शकाने तिचा मोलकरणीसोबत इंटिमेट सीन दाखवला आहे. त्यामुळे अनेकांना हे पटले नाही. या सीनवरून सोनाक्षीला ट्रोल करण्यात आले. दरम्यान आता यावर अभिनेत्रीने मौन सोडले आहे.

सोनाक्षी सिन्हाने साकारलेल्या फरीदनची आवड एका जेंडरपर्यंत सीमित नाहीये. तिने न्यूज १८ ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सुरूवातीला सरांनी मला सांगितले होते की, फरीदन खूपच फ्लूड आहे. लोक हीरामंडी सारख्या ठिकाणी खूप ओपन होताता. सर्वांना माहित आहे की, उत्सादजीदेखील गे होते. संजय सरांना हे वेगळ्या पद्धतीने दाखवायचे होते.

आम्ही तुम्हाला फ्लूड शब्दाचा अर्थ सांगतो, हा शब्द त्या व्यक्तीसाठी वापरला जातो, ज्याची आवड एका जेंडर पर्यंत मर्यादीत नसते.

फरदीनचे मोलकरणीसोबतचे संबंध दाखवले आहेत. या भूमिकेबद्दल सोनाक्षी म्हणाली की, तिला वयाच्या ९व्या वर्षी विकले जाते. त्यामुळेच ती पुरूषांचा तिरस्कार करते. हे इतके उघडे ठेवण्याचे कारण असू शकते.

सोनाक्षी पुढे म्हणाली की, जग खूप मोठे आहे. संजय सरांनी बरेच पैलू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सोनाक्षीने सीरिजमध्ये निगेटिव्ह भूमिका केली आहे. जी आपल्या आईला न्याय देण्याचा प्रयत्न करत असते.

या सीरिजमध्ये तिने आई आणि लेक अशा दोन भूमिका केल्या आहेत.

सोनाक्षी सिन्हाने हीरामंडीमधील लूक टेस्टचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावर काहींनी तिचं खूप कौतुक केले.

सोनाक्षी सिन्हाचे या सीरिजमधील कॉश्च्युम खूप भावले होते की तिने हे फोटो प्रॉडक्शनकडून मागून घेतले होते.

सोनाक्षी सिन्हाचे हीरामंडीमधील कामाचे सर्वत्र खूप कौतुक होताना दिसत आहे.

हीरामंडी ही वेबसीरिज १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली.