"सध्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहोत", वीणासोबत ब्रेकअपच्या चर्चांवर शिव ठाकरेचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 04:30 PM2021-03-13T16:30:05+5:302021-03-13T16:35:43+5:30

गेल्या काही दिवसांपासून शिव ठाकरे आणि अभिनेत्री वीणा जगताप त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांमुळे चर्चेत होते. दोन दिवसांपूर्वी आलेल्या ब्रेकअपच्या बातम्यांना अफवा ठरवत शिव ठाकरेने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

'मराठी बिग बॉस सिझन २' चा विजेता शिव ठाकरे अभिनेत्री वीणा जगतापसह त्यांच्या नात्याविषयी जाहीर कबुली दिली होती.

सोशल मीडियावर दोघेही एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत आपल्या प्रेमाची कबुली देताना दिसायचे.

त्यांच्या रोमान्सची जितकी चर्चा झाली.तितकी ब्रेकअपचीही चर्चा होत आहे.

सोशल मीडियावर दोघेही त्यांच्या चाहत्यांसह संपर्कात होते. दोघांचेही एकत्र फोटो ते चाहत्यांसह शेअर करायचे.

गेल्या काही दिवसांपासून दोघांनी सोशल मीडियावर कसलीच माहिती शेअर केली नाही.

अचानक दोघांचे एकत्र दिसणे बंद झाले. एकत्र फोटोही सोशल मीडियावर पाहायला मिळाले नाही.

त्यामुळे दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

लॉकडाउननंतर आम्ही दोघंही लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असल्याचे शिव ठाकरेने सांगितले आहे.

दोघेही आपापल्या कामात बिझी आहोत. सध्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहोत.

योग्य वेळ आली की नक्कीच लग्नाचा विचार करून लग्नबांधनात अडकायलाही आवडेल असेही त्याने सांगितले.’