यळकोट यळकोट जय मल्हार! मराठी अभिनेत्री पतीसोबत जेजूरीतील खंडोबा मंदिरात नतमस्तक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 15:42 IST2024-12-06T15:10:51+5:302024-12-06T15:42:16+5:30
तुझ्यात जीव रंगला मधील वहिनीसाहेबांनी जेजूरीला जाऊन खंडोबा मंदिरात दर्शन घेतलं (dhanashree kadgaonkar)

धनश्री काडगावकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. धनश्री अलीकडेच पतीसोबत जेजूरीला गेली होती
धनश्री काडगावकरने जेजूरीला जाऊन मनोभावे दर्शन घेतलं. शूटिंगच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून धनश्रीने जेजूरीची ही भक्तिपूर्ण भटकंती केली
भंडारा उधळत आणि खंडोबासमोर नतमस्तक होत धनश्रीने सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर केलेत.
धनश्री काडगावकरने मंदिराच्या बाहेर येऊन कळसाला नमस्कार केला. धनश्रीच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांनी पसंती दिलीय
धनश्री काडगावकरने तुझ्यात जीव रंगला मालिकेत साकारलेली वहिनीसाहेबांची भूमिका चांगलीच गाजली. धनश्रीने अलीकडेच तू चाल पुढं मालिकेत अभिनय केला
धनश्री काडगावकर आणि तिचा पती दुर्वेश देशमुख सोशल मीडियावर चर्चेत असतात. दोघांच्या जेजूरीच्या या खास फोटोंनाही चाहत्यांनी प्रेम दिलंय
धनश्री काडगावकरने जेजूरीचं दर्शन घेतल्यावर खास मिसळ पावचा आस्वाद घेतला. त्याचाही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला