'रामायण'मधील 'लक्ष्मण' फेम सुनील लहरींचं दोनदा तुटलं लग्न, एकाकी जगताहेत जीवन, त्यांचा मुलगाही आहे अभिनेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 14:08 IST2025-10-17T13:58:37+5:302025-10-17T14:08:26+5:30
Ramayan Fame Actor Sunil Lahiri : रामानंद सागर यांच्या 'रामायण'मध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी यांचं फॅन फॉलोव्हिंग खूप आहे. मात्र खासगी आयुष्यात ते एकटे आहेत.

रामानंद सागर यांच्या रामायणमध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी यांचं फॅन फॉलोव्हिंग खूप आहे. मात्र खासगी आयुष्यात ते एकटे आहेत.
सुनील लहरी यांनी दोन लग्नं केली पण दोन्ही लग्न अपयशी झाले. पहिले लग्न सुनील यांनी राधा सेन यांच्यासोबत केले होते. मात्र लगेच वेगळे झाले.
त्यानंतर सुनील यांनी दुसरं लग्न भारती पाठकसोबत केले. त्यांना एक मुलगा आहे. ज्याचं नाव आहे कृष पाठक. तोदेखील पेश्याने अभिनेता आहे. मात्र हे नातेदेखील फार काळ टिकले नाही.
सुनील लहिरी यांचा मुलगा कृषने सांगितले होते की, तो ९ महिन्यांचा होता तेव्हा त्याचे पालक वेगळे झाले होते. त्याची आई भारती यांनी त्याचे संगोपन केले.
सुनील लहिरी भलेही सेलिब्रेटी असले तरी त्यांची दुसरी पत्नी भारती पाठक नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहिल्या. त्यांचा चेहरा कधीच समोर आला नाही.
मात्र आता कित्येक वर्षांनंतर त्यांची सून सारा खानची पोस्ट पाहून भारती पाठक लाइमलाइटमध्ये आल्या.
भारती पाठक सोशल मीडियावर सक्रीय आहेत. त्यांचे ९३३ फॉलोव्हर्स आहेत. त्या एअरहोस्टेस होत्या.
भारती यांचं मुलगा आणि सूनेसोबत छान बॉण्डिंग आहे. साराने पोस्टमध्ये आपल्या सासूबाईंना सासू कमी आणि आई जास्त असल्याचं म्हटलं आहे आणि लिहिलं की, आमच्या वर आशीर्वाद नेहमीच राहिल.
सुनील यांचा मुलगा कृषने नुकतेच अभिनेत्री सारा खानसोबत कोर्टमॅरेज केले. हे जोडपं ५ डिसेंबरला ग्रॅण्ड वेडिंग करणार आहेत.