मराठी मनोरंजनविश्वातील दोन कपल्स श्रीलंकेत करतायेत एन्जॉय, शेअर केले बीचवरील Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 13:00 IST2025-04-29T12:47:09+5:302025-04-29T13:00:11+5:30
मराठी स्टार्सची श्रीलंकावारी! Photos पाहिले का

मराठी कलाविश्वातील दोन जोडपी नुकतेच श्रीलंकेला गेले आहेत. या परदेशातील व्हेकेशनचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत.
चला हवा येऊ द्या फेम अभिनेत्री श्रेया बुगडेने (Shreya Bugde) इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत सरप्राईज दिलं आहे. पती निखिलसोबत ती श्रीलंकेत एन्जॉय करत आहे.
श्रेया आणि निखिल यांच्यासोबत आणखी एक टीव्ही कपल आहे. ते म्हणजे पियुष रानडे (Piyush Ranade) आणि सुरुची अडारकर (Suruchi Adarkar).
श्रेया बुगडे आणि पियुष रानडे आधीपासूनच खूप चांगले मित्र आहेत. पियुषने गेल्या वर्षीच सुरुची अडारकरसोबत तिसरं लग्न केलं. आता चौघंही श्रीलंकेत एन्जॉय करत आहेत.
व्हाईट लाँग शर्ट, डोक्यावर स्कार्फ, गॉगल आणि हातात स्टायलिश बॅग या लूकमध्ये श्रेयाने फोटो शेअर केलेत. श्रीलंकेतील बीचवर ती summer vibe देत आहे.
तर दुसरीकडे गुलाबी आऊटफिटमध्ये पियुष रानडे आणि सुरुची अडारकर कपल गोल्स देत आहेत. नुकताच सुरुचीने वाढदिवस साजरा केला.
श्रीलंकेत केलेली धमाल त्यांनी फोटोंमधून दाखवली आहे. त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स करत प्रेमाचा वर्षाव केला आहे.