'कॉमेडी सर्कस महासंग्रामधली' चिमुरडी गंगूबाई आठवते का ? २० वर्षांनंतर दिसते अशी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 09:00 AM2021-10-05T09:00:00+5:302021-10-05T09:00:00+5:30

'गंगूबाई' म्हणून प्रचलित झालेली कॉमेडीयन सलोनी डॅनीने तीन वर्षांची असताना 'कॉमेडी सर्कस महासंग्राम' शोमधून छोट्या पडद्यावर एन्ट्री केली आणि या पदार्पणातच ती गंगूबाई म्हणून घराघरात पोहचली होती.

'कॉमेडी सर्कस महासंग्राम' शोनंतर तिला ओळख मिळाली.

चिमुरड्या सलोनीचे टॅलेंट पाहून प्रेक्षक थक्क झाले होते.

आता ही चिमुरडी सलोनी २० वर्षांची झाली आहे आणि आता तिला ओळखणेदेखील कठीण झाले आहे.

तिचा स्टायलिश अंदाज पाहून सोशल मीडियावर सर्वच चकीत झाले आहेत.

'कॉमेडी सर्कस महासंग्राम'नंतर सलोनी 'इक्का-दुक्का' या मालिकेतही दिसली.

मात्र या मालिकेत तिला म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही.

'बड़े भइया की दुल्हनिया' या मालिकेत ती शेवटची झळकली होती.

त्यानंतर ती छोट्या पडद्यावरुन गायब झाली.

२०१० साली 'नो प्रोब्लेम' सिनेमात तिने कॅमिओ केला होता.