Photos: मकरसंक्रांत निमित्त अभिनेत्रींचं सुंदर फोटोशूट, काळ्या साडीत खुललं सौंदर्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 18:31 IST2025-01-14T18:10:39+5:302025-01-14T18:31:25+5:30
नवीन वर्षांतील पहिला सण मकरसंक्रांत (Makar Sankranti 2025). याच निमित्ताने मराठी अभिनेत्रींनी खास फोटोशूट केलं आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar ) हिने संक्रांतीनिमित्त खास फोटो पोस्ट केलाय. ज्यात ती प्रचंड सुंदर दिसतेय. तिने काळ्या रंगाची साडी आणि ब्लाऊज परिधान केला आहे.
अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) हिनं काळ्या साडीतील सुंदर फोटो शेअर केलाय. तिनं चाहत्यांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मकर संक्रांतीच्या निमित्ताने अभिनेत्री प्रार्थना बेहेरेनं (Prarthana Behere ) खास काळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे. तिचा मराठमोळा साज चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे.
"Happy संक्रांत!" असं म्हणत अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हिनं खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोशूटमध्ये सईचा पारंपारिक अंदाज पाहायला मिळतोय.
"मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा! तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला!", असं कॅप्शन देत अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) हिनं फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री सायली संजीवने (Sayali Sanjeev) काळ्या साडीमध्ये नवं फोटोशूट केलं. यामध्ये सायली खूपच सुंदर दिसत आहे.
अभिनेत्री शिवानी रांगोळेचा (Shivani Rangole) मकर संक्रांतीनिमित्त खास लूक केला. "Speak गोड, think गोड!",असं कॅप्शन तिनं या फोटोंना दिलं.
"मकर सक्रांतीच्या खूप शुभेच्छा", असं म्हणत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar Makar Sankrant 2025 )यांनी काळ्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) हिनं ऑस्ट्रेलियात नवऱ्यासोबत पहिली मकरसंक्रांत साजरी केली.
अभिनेत्री रेश्मा शिंदे ही काळ्या रंगाच्या साडीत अगदी सुंदर दिसत आहे. "मकर सक्रांतीच्या दिवशी काळ्या साडीतला फोटो पोस्ट करणे गरजेच आहे,शास्त्र असतं ते. मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा", असं म्हणत तिन चाहत्यांना शुभेच्छा दिल्या.