Indian Idol 12 फेम सायली कांबळेनं लग्नानंतर साजरा केला पहिला सण गणेशोत्सव, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 17:56 IST2022-09-03T17:49:01+5:302022-09-03T17:56:36+5:30
Indian Idol 12 Fame Sayli Kamble : सायली कांबळे हिने २४ एप्रिल, २०२२ रोजी प्रियकर धवलसोबत लग्नगाठ बांधली आहे.

indian idol 12 fame Sayli Kamble Wedding ‘इंडियन आयडल 12’ची सेकंड रनर अप सायली कांबळे (Sayli Kamble) हिने आपल्या सुरेल स्वराने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
Indian Idol 12 शोमधून सायली कांबळेला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.
या शोनंतर सायली कांबळेच्या फॅन फॉलोव्हिंगमध्येही चांगलीच वाढ झाली आहे.
सायली कांबळे सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते.
सायली कांबळेने २४ एप्रिल, २०२२ रोजी प्रियकर धवलसोबत लग्नाच्या आणाभाका घेतल्या.
महाराष्ट्रीय पद्धतीने अगदी थाटामाटात सायली आणि धवलचा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्न सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते.
सायली कांबळेनं लग्नानंतरचा पहिला सण म्हणजे गणेशोत्सव साजरा केला आहे.
सायली कांबळेने फोटो शेअर करत लिहिले की,श्रीमती पाटील झाल्यानंतरचा पहिला सण..!!असे कुटुंब मिळणे खरोखरच धन्य आहे बाप्पा तुम्हा सर्वांना भरभराट आणि प्रेम देवो..!! गणपती बाप्पा मोरया..
सायली कांबळेच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.