हप्पू की उलटन पलटन या मालिकेतील कामना पाठक खऱ्या आयुष्यात दिसते पूर्णपणे वेगळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 18:30 IST2019-03-27T18:17:08+5:302019-03-27T18:30:51+5:30

हप्पू की उलटन पलटन या मालिकेतील कामना पाठक तिच्या मालिकेतील लूकपेक्षा खऱ्या आयुष्यात खूप वेगळी दिसते.
कामना पाठक मालिकेत भारतीय पेहरावात दिसत असली तरी ती खऱ्या आयुष्यात तिला पाश्चिमात्य कपडे देखील घालायला आवडतात.
कामना पाठक नेहमीच सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट करत असते. तिच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांची नेहमीच पसंती मिळते.
कामना पाठक आज मालिकेत काम करत असली तरी इंग्रजी चित्रपटाद्वारे तिने तिच्या करियरला सुरुवात केली होती.
कामना पाठक ही मुळची इंदौरची असून तिचे शिक्षण दिल्लीत झाले आहे.