Anupamaa मालिकेत नवीन ट्विस्ट, अनुपमाला एकटं सोडून अनुज जाणार मायासोबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 18:21 IST2023-02-22T18:21:31+5:302023-02-22T18:21:31+5:30

अनुपमा या टीव्ही शोमध्ये छोट्या अनु आणि अनुजच्या जवळ जाण्यासाठी माया कोणतीही कसर सोडत नाही. (फोटो - इंस्टाग्राम)
कपाडियाच्या घरी अनुपमाच्या अनुपस्थितीत लहान अनुच्या जवळ जाण्याचा माया तिचा पुरेपूर प्रयत्न करते. (फोटो - इंस्टाग्राम)
धाकट्या अनुच्या शाळेच्या पिकनिकला अनुपमाऐवजी माया जाईल. अनुपमा अनुजच्या निर्णयाने दु:खी झालेली दिसते. (फोटो - इंस्टाग्राम)
अनुज त्याच्या निर्णयाबद्दल अनुपमाची एकांतात माफी मागेल आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करेल. (फोटो - इंस्टाग्राम)
शाह घरामध्ये, काव्या वनराजला तिच्यापासून दूर राहण्यास सांगेल आणि त्याच्यावर तिचे करिअर बरबाद केल्याचा आरोप करताना दिसेल. (फोटो - इंस्टाग्राम)
पिकनिकला काही लोक मायाला अनुची खरी आई समजतील पण अनुज समुद्रकिनारी येऊन सर्वांना सांगेल आणि मायाला हे अजिबात आवडणार नाही. (फोटो - इंस्टाग्राम)