दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने शेअर केले मालदीव व्हॅकेशनचे स्टनिंग फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 16:24 IST2020-11-27T16:24:27+5:302020-11-27T16:24:27+5:30

दबंग फेम अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा नुकतीच मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करून परतली आहे.
सोनाक्षी सिन्हाने मालदीव व्हॅकेशनचे फोटो अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोत ती खूप ग्लॅमरस दिसते आहे.
तिचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
सोनाक्षी सिन्हाने कधी सनसेट एन्जॉय करताना तर कधी समुद्राच्या पाण्याचा आनंद घेतानाचे फोटो शेअर केले आहेत.
प्रत्येक फोटोमध्ये सोनाक्षी स्टनिंग दिसते आहे.
सोनाक्षीने काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहे ज्यात तिने सांगितले की तिला स्कूबा डाइव्हरचे लाइसेंस मिळाले आहे. सोनाक्षीने सांगितले की, बऱ्याच कालावधीपासून हे हवे होते आणि अखेर मिळाले.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सोनाक्षी सिन्हा लवकरच संजय दत्त आणि अजय देवगणसोबत भुज द प्राइड ऑफ इंडियामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नोरा फतेही आणि शरद केळकर दिसणार आहे.