Shahid Kapoor : "मी २५० ऑडिशन्स दिल्या, कपडे घ्यायला नव्हते पैसे; पण काही लोक BMWमध्येही स्ट्रगल करतात"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 16:50 IST2025-01-26T16:32:30+5:302025-01-26T16:50:26+5:30
Shahid Kapoor : शाहिदला इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. अनेक ऑडिशन्स द्याव्या लागल्या.

शाहिद कपूर आज बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. शाहिदचे वडील पंकज कपूर हे देखील इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्यांमध्ये गणले जातात. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
शाहिदला इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. अनेक ऑडिशन्स द्याव्या लागल्या. त्याला प्रसिद्धी, लोकप्रियता आणि नाव हे सहजासहजी मिळालेलं नाही.
शाहिद फक्त ३ वर्षांचा असताना त्याचे आईवडील वेगळे झाले. शाहिदचं संगोपन त्याची आई नीलिमा अझीम यांनी केलं. लहानपणी खूप त्रास सहन करावा लागला. भाड्याच्या घरात राहावं लागलं.
आता अभिनेत्याने काही पर्सनल गोष्टी शेअर केल्या आहेत. त्याचा आयुष्यातील कठीण काळ आणि परिस्थिती याबाबत सांगितलं आहे.
राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये आपल्या संघर्षांबद्दल बोलताना शाहिद म्हणाला - "माझे वडील अभिनेते आहेत आणि माझी आई कथक डान्सर आहे. मी भाड्याच्या घरात राहिलो."
"मी अनेक ऑडिशन्स दिल्या आहेत. मला कोणतेही विशेषाधिकार मिळाले नाहीत. आता फॅशन सेन्सचं खूप कौतुक केलं जातं पण तेव्हा परिस्थिती फार वेगळी होती."
"माझ्या संपूर्ण आयुष्यात, माझ्या परिस्थितीमुळे मला मी व्हिक्टिम असल्यासारखं वाटलं आहे. पण काही लोक तर बीएमडब्ल्यूमध्येही स्ट्रगल करतात. मी २५० ऑडिशन्स देऊन आलो आहे. माझ्या परिस्थितीने मला साथ दिली नाही."
"लोक म्हणतात की, शाहिदचा फॅशन सेन्स खूप चांगला आहे. पण मला अशा गोष्टींवर हसू येतं, कारण मला तो काळ आठवतो जेव्हा माझ्याकडे लोखंडवाला येथून कपडे खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते."
शाहिद लवकरच 'देवा' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शाहिद एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
'देवा'च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता चाहते चित्रपटाची वाट पाहत आहेत. 'देवा' हा चित्रपट ३१ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.